Loan Scheme : ‘पीडीसीसी’कडून ‘बळीराजा मुदत कर्ज योजने’ची घोषणा

Baliraja Term Loan Scheme : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ‘बळीराजा मुदत कर्ज योजने’ची घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केली.
Loan Scheme
Loan Scheme Agrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांना शेतीशी निगडित तसेच इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. यात प्रामुख्याने जनावरांच्या देखभालीचा खर्च, शेतकऱ्यांच्या आकस्मिक गरजा अशा विविध घटकांसाठी कर्जपुरवठा व्हावा यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ‘बळीराजा मुदत कर्ज योजने’ची घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केली.

‘पीडीसीसी’च्या वतीने नोव्हेबर २०२३ अखेरची आर्थिक स्थितीची माहितीसाठी पत्रकार परिषद शुक्रवारी (ता. २९) आयोजित करण्यात आली होती. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, सहायक सरव्यवस्थापक समीर राजपूत, उपसरव्यवस्थापक संजय वाबळे, सुधीर पाटोळे आदी उपस्थित होते.

Loan Scheme
Farmer Loan Waive Scheme : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२ हजार खातेदार अपात्र

श्री. दुर्गाडे म्हणाले, की यंदा ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्यासाठी साडेदहा टक्के व्याजदर आकारण्यात येत आहे. परतफेड सात वर्षे एवढी आहे. या सर्व प्रकारात संबंधित गरजू शेतकरी सभासद जादा व्याजदरामुळे आर्थिक अडचणीत जात आहे. शेतकऱ्यांना सहज, तत्पर कर्ज मिळावे.

यासाठी शेतीकर्ज पुरवठ्याअंतर्गत मागणी व परतफेड क्षमता याचा विचार करून धोरण निश्चित केले. याअंतर्गत बँकेच्या शेतीकर्ज विभागामार्फत विविध कार्यकारी संस्थांना थेट कर्जदार सभासदांना प्रति एकरी कमीत कमी १ लाख ५० हजार ते जास्तीत जास्त ७ लाख लाख रुपयांच्या मर्यादेत मागणीनुसार कर्जपुरवठा करण्यात येणार आहे.

Loan Scheme
Educational Loan Scheme : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना

...यासाठी लाभ देण्यात येणार

औषधोपचार खर्च, विवाह, यात्रा, सहल, व्यावसायिक गरजा, शैक्षणिक खर्च, किरकोळ घराची दुरुस्ती, गृहपयोगी वस्तू, संगणक, दुचाकी, चारचाकी वाहन खरेदी- दुरुस्ती, इतर आनुषंगिक कारणे.

बँकेत भरती होणारच

बँकेत एकूण ३५६ पदे रिक्त आहेत. त्याची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु काही कारणांमुळे ही भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. आता रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे.

साखर कारखान्यांना १६५ कोटींच्या कर्जांना मंजुरी

गेल्या एक ते दोन वर्षांपासून साखर कारखान्यांनी बॅंकेकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु व्याजदर कमी केल्याने चालू वर्षी काही प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा साखर कारखान्यांना १६५ कोटीच्या कर्जाना मंजुरी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com