PDCC Bank : ‘पीडीसीसी’ बँकेचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात

Pune District Central Co-Operative Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०६ वर्धापन दिन सोमवारी (ता. ४) उत्साहात साजरा करण्यात आला.
PDCC Bank
PDCC BankAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०६ वर्धापन दिन सोमवारी (ता. ४) उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक प्रवीण शिंदे, संचालिका निर्मला जागडे, संचालिका पूजा बुट्टे पाटील, संचालक अंकुश उभे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी या वेळी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त बॅंकेने सेवक व बँक सभासदांकरिता डॉ. अनिल दहीभाते यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा ४०० सभासदांनी लाभ घेतला.

PDCC Bank
Bullock Cart Race : पुणे जिल्ह्यात बैल गाडा शर्यतीवर बंदी ; जिल्हा प्रशासनाचे आदेश

पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ दिगंबर दुर्गाडे म्हणाले, की १९१७ मध्ये स्थापन झालेल्या बँकेचे यश हे सर्व बँकेचे विश्‍वासू खातेदार व सेवक यांचे आहे. बँकेच्या काम करत असताना प्लॅनिंग व मॅनेजमेंट या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवकांचे व खातेदारांचे बँकिंग पलीकडचे नाते असल्यामुळे खातेदारांना जिल्हा बँकेत व्यवहार करण्यास सोपे जाते. त्यामुळे बॅँकेचा नावलौकिक वाढत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई म्हणाले, की बँकेचा रोड मॅप तयार करणे गरजेचे आहे. बँकेच्या सर्व सेवकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजे. बँकेच्या प्रगतीकरिता सर्व सेवकांनी बँकेचे प्रॉडक्ट विकण्याची कला आत्मसात करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात बँकेचे उपसरव्यवस्थापक संजय शितोळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बँक उत्तम प्रकारचे काम करत आहे. बँकेने सेवकांकरिता तीन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी पाच लाखांपर्यंत केली आहे.
- सुनील चांदेरे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com