Kharif Sesson Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer, Seed Selling : पाऊस लांबल्याने बियाणे, खते विक्रीवर परिणाम

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : पावसाचे लांबलेले आगमन खते बियाणे व इतर निविष्ठांच्या विक्रीवर परिणाम करून गेले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत खते, बियाणे विक्री जेमतेमच झाली आहे.

यंदा मराठवाड्यात गत तीन वर्षांच्या तुलनेत पावसाचे आगमन लांबल्याची स्थिती आहे. आणखी किती दिवस हे आगमन लांबणीवर पडणार हे निश्चित सांगणे अवघड बनले आहे. त्याचा थेट परिणाम खरिपासाठी शेती तयार करून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या खत, बियाणे खरेदीवर झाला आहे.

तूर्त शेतकरी केवळ त्याला आवश्यक असलेल्या बियाणे व खतांचे दर काय याचीच चौकशी करताना दिसतो आहे. तीनही जिल्ह्यांत ६ लाख ९ हजार ५३१ टन सर्वच प्रकारच्या खतांची उपलब्धता झाली होती. सोमवारअखेपर्यंत (ता. १९) त्यापैकी १ लाख ७० हजार ६३५ टन खताची विक्री झाली. तर ४ लाख ३८ हजार ८९६ टन खते तीनही जिल्हे मिळून शिल्लक होते.

दमदार व पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बियाणे, खते खरेदीला प्राधान्य देतील, असे दिसत नाही. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे तर कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांच्या नजरही सध्या मॉन्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत.

बियाणे विक्रीही मंदच

छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांत मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, संकरित कपाशी व सोयाबीन बियाण्याची विक्री तूर्त मंद गतीनेच सुरू आहे. तीनही जिल्ह्यांत ज्वारीच्या २३६ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. परंतु बाजारात अद्याप बियाणे पुरवठा झालेला नाही.

संकरित बाजरीच्या पुरवठा झालेल्या १२२३ क्विंटल पैकी केवळ २४३ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. मक्याच्या ३१ हजार ८८० क्विंटल उपलब्ध बियाण्यांपैकी २२५ क्विंटल बियाणे विकल्या गेले. तुरीच्या उपलब्ध २२७९ क्विंटल बियाण्यांपैकी ३०८ क्विंटल बियाणे विकल्या गेले.

मुगाच्या १२४६ क्विंटल बियाण्यांपैकी १२२ क्विंटल, उडदाच्या २३८६ क्विंटल बियाण्यांपैकी ४५२ क्विंटल, भूईमुगाच्या ३५५ क्विंटलपैकी २१ क्विंटल, सूर्यफुलाच्या ९ क्विंटल पैकी दोन क्विंटल, तिळाच्या ५ क्विंटल पैकी २ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. तीनही जिल्ह्यांत संकरित कपाशीच्या अपेक्षित ४१ लाख ४४ हजार ११११ बियाणे पाकिटापैकी ४० लाख ४९७३ बियाणे पाकिटे बाजारात उपलब्ध झाली.

त्यापैकी जवळपास निम्मी पाकीट विकल्या गेली. तिन्ही जिल्ह्यांत सोयाबीनचे १ लाख ६६ हजार ५ क्विंटल बियाणे बाजारात पुरविले गेले. बीड जिल्ह्यात बाजारात पुरविल्या गेलेल्या एक लाख २७ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यापैकी २७ हजार २०० क्विंटल बियाणे विक्री झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय विविध खताची

उपलब्धता व विक्री (टनांमध्ये)

जिल्हा - उपलब्धता - विक्री - शिल्लक

छ. संभाजीनगर - २४३४२९- ८८८९५ - १५४५३४

जालना - २०६५८५- ४९६७५- १५६९१०

बीड- १५९५१७- ३२०६५ - १२७४५२

विशिष्ट वाणाचा आग्रह शेतकऱ्यांनी धरू नये. शिवाय कुणी बियाणे, खते चढ्या दराने विक्री करीत असल्यास किंवा कुठे बोगस कृषीनिविष्ठा विक्री होत असल्यास कृषी विभागाच्या पथकाला त्याची तत्काळ माहिती द्यावी. अशांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
आशिष काळुसे, तंत्र अधिकारी, गुण नियंत्रण छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT