Fertilizer Shops Suspended : अठरा कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित

Kharif Season : नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी १६ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने आतापर्यंत खते, बि-बियाणे, कीटकनाशक अशा एकूण २ हजार ८४३ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे.
Agriculture center
Agriculture centerAgrowon
Published on
Updated on

Nashik Fertilizer News : नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी १६ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने आतापर्यंत खते, बि-बियाणे, कीटकनाशक अशा एकूण २ हजार ८४३ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे.

यात बोगस खत विक्री केल्याप्रकरणी ११ खते दुकाने व ७ कीटकनाशक दुकानांचा विक्री परवाना निलंबित करण्यात आला आहे. तर ५६ बियाणे विक्रेत्यांना व १२ खत विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, वजने मापे निरीक्षक, कृषी अधिकारी पंचायत, तर जिल्हास्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजने माप निरीक्षकांचा पथकात समावेश आहे.

तालुकास्तरावरील १५ तर, जिल्हास्तरीय १ अशा १६ भरारी पथके कृषीशी निगडित असणारी खते, बी-बियाणे, कीटकनाशक दुकानांची तपासणी केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ व जिल्हा मोहीम अधिकारी अभिजित जमदाडे यांनी दिली.

Agriculture center
Agriculture Fertilizer : शेतात विकतची खते वापरण्याची गरज नाही

आतापर्यंत जिल्ह्यातील नोंदणी असलेल्या एकूण २,९६० खत विक्रेत्यांपैकी १,१०१ विक्रेत्यांची तपासण्या झाल्या आहेत. यात भरारी पथकाने ३५ खत विक्रेत्यांच्या. तपासण्या केल्या आहेत. यात ५ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत.

१२ विक्रेत्यांना विक्रीबंदचे तर, ११ विक्रेत्यांचे परवाना निलंबित केले आहे. बियाणे विक्रेत्यांची एकूण नोंदणी ३,२१० असून त्यापैकी १,३४२ विक्रेत्यांची तपासणी झाली आहे. भरारी पथकाने ४९ विक्रेत्यांची नमुने तपासणीसाठी घेतले. यात ५६ विक्रेत्यांना विक्रीबंदचे आदेश देण्यात आले आहे.

३,१६४ कीटकनाशके विक्रेत्यांची नोंदणी झालेली असून यातील ४०० विक्रेत्यांची तपासणी झाली आहे. भरारी पथकाने ३३ कीटकनाशके विक्रेत्यांची तपासणी केली आहे. यात एक नमुना अप्रमाणित आढळला आहे. ४ विक्रेत्यांना विक्रीबंदचे आदेश तर, ७ विक्रेत्यांचे परवाना निलंबित केले आहे.

विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस परवाने निलंबित केलेल्या संबंधित सर्व कंपन्यांना व खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.

बोगस खत, बियाणे, कीटकनाशक विक्री संदर्भात शेतकऱ्यांची तक्रार असल्यास त्यांनी ७८२१०३२४०८ या तक्रार निवारण. कक्षावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिरसाठ यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com