Dharashiv urad and moong procurement: धाराशिवः हमीभाव केंद्रावर सोयाबीन, उडीद, मुगाची विक्री करण्यासाठी नावनोंदणीसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी येथील केंद्रावर नावनोंदणीची वेबसाइट अत्यंत संथगतीने चालत असल्याने शेतकऱ्यांना अनेक तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. .जिल्ह्यात आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने १८ केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणीला ३० ऑक्टोबरपासून सुरवात करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपासून खरेदी करण्यात येणार आहे. मूग, उडीद, सोयाबीनची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, ऑनलाइन पिकपेरा असलेला सातबारा ही कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. .Urad Market : उडदाच्या विक्रीत फसकीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट.धाराशिव येथे खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर शेतकरी ऑनलाइन नोंदणीसाठी येत आहेत; मात्र वेबसाइट अत्यंत संथगतीने चालत असल्याने तासनतास ताटकळत थांबावे लागत आहे..Moong Crop loss: अतिवृष्टीचा तडाखा मूग पिकाला; नुकसानभरपाईची मागणी.जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यातून शिल्लक राहिलेल्या पिकांची काढणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र बाजारपेठेत कमी दराने सोयाबीन, उडीद, मुगाची खरेदी केली जात आहे. पावसामुळे भिजल्याने सोयाबीनची प्रत खराब असल्याचे कारण देत कमी दरामध्ये खरेदीकडे व्यापाऱ्यांचा कल आहे. सोयाबीनचा हमीभाव पाच हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र बाजारपेठेत चार हजारांपेक्षा कमी दराने प्रतवारी पाहून व्यापारी खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा कल हमीभाव केंद्रावर विक्रीकडे आहे. हमीभाव लक्षात घेता शेतकरी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ऑनलाइन नाव नोंदणीसाठी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. धाराशिवच्या खरेदी-विक्री केंद्रामध्ये नाव नोंदणी करून घेतली जात आहे. वेळेत नोंदणी होण्यासाठी तेथील कर्मचारीही प्रयत्न करीत आहेत. मात्र वेबसाइटच संथगतीने चालत असल्याने नोंदणीला विलंब होत आहे. .कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर बायोमेट्रिकऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित कागदपत्रे घेऊन स्वतः केंद्रावर येणे आवश्यक आहे. याठिकाणी कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर ती अपलोड केली जातात आणि शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा बायोमेट्रिकवर घेतला जातो. त्यासाठी सोबत मोबाईल घेऊन येणेही आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणीवेळी येणारा ओटीपी सांगावा लागतो. त्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.