Sugarcane Plantation: देवणी : तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने सर्वच प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीकडे वळाले असून, शेतशिवारात ऊस लागवडीची लगबग पाहावयास मिळत आहे. देवणी तालुक्यात यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. मांजरा नदीवरील महत्त्वाकांक्षी धनेगाव बँरेजमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय विंधन विहीर व विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी लागवडीच्या कामाला प्राधान्य देत आहेत. .उसाच्या नवनवीन जातीचा शोध घेत उशिरा पक्व होणाऱ्या व अधिक उत्पादन देणाऱ्या उसाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात उसाची लागवड झाल्यास वेळेत कारखाना तोड होऊन उत्पादन अधिक निघण्यास मदत होत असल्यामुळे शेतकरी उसाची लागवड करीत आहेत. .Sugarcane Harvest: ऊस तोडणीचे शास्त्रीय नियोजन.सोयाबीनच्या बाजारभावात गेल्या दोन वर्षांत सतत घटच होत आहे. सध्या बाजारात हमीभावापेक्षा कमी ४००० रुपयाने सोयाबीन विक्री होत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहेत त्यांनी उसाच्या लागवडीचा पर्याय निवडला आहे. एकरी पन्नास टनांपर्यंतही उत्पादन निघाले तरी मागील वर्षीच्या दराप्रमाणे दीड लाख रुपये उसातून उत्पादन निघते. एकरी पन्नास हजार रुपयांपर्यंतही खर्च झाला तरी एक लाख रुपये हमखास उत्पादन निघत असल्यामुळे शेतकरी ऊसशेतीला प्राधान्य देत आहेत. सोयाबीन काढणीनंतर शेतीची नांगरणी, पाळी, तिरी, रुटर करून सरी मारणे, लावणीसाठी बेण्याचा खर्च, मजूर यावर मोठा खर्च करावा लागत आहे..Sugarcane Price: साखर कारखान्यांच्या नफ्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा, काय आहे उसाचा रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला?.हमखास उत्पादन देणारे पीक ऊसबदलत्या स्थितीमध्ये भाजीपाला पिकावर होणारा रोगांचा प्रादुर्भाव, गारपीट, अवकाळी पाऊस यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे अन्य पिकांऐवजी उसाचे पीक शेतकऱ्यांसाठी सुरक्षित अन् आश्वासक आहे. एकदा लागवड केली की हमखास उत्पादन निघण्याची हमी असल्यामुळे सिंचन सुविधा उपलब्ध असणारे शेतकरी उसाला पहिली पसंती देतात. त्यातून सध्या तालुक्यात ऊस क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दशकांत ऊस क्षेत्रातील वाढीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.