Animal Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Production : परभणीत उत्पादित होणारा चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास मनाई

Animal Fodder Update : परभणी जिल्ह्यात उत्पादित होणारा विविध प्रकाराचा चारा, मुरघास यांची वाहतूक जिल्ह्याबाहेर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे येत्या काळात जनावरांसाठी गंभीर चाराटंचाई उद्‍भवू शकते. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादित होणारा विविध प्रकाराचा चारा, मुरघास यांची वाहतूक जिल्ह्याबाहेर करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या संदर्भात आदेश काढला आहे.

जिल्ह्यात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार ता. १ एप्रिल २०२३ पासून ३ लाख ६५ हजार १७४ टन चारा शिल्लक असून, तो अंदाजे एप्रिल २०२४ पर्यंत पुरेल. एवढ्या चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, एकूण मिक्स रेशन (टीएमआर) वाहतुकीवर बंदी आणल्यास माहे एप्रिल २०२४ अखेर पर्यंत चाराटंचाई भासणार नाही. जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि एकूण मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास बंदी आणणे, जिल्ह्याबाहेरील निविदाधारकांना लिलाव देण्यात येऊ नये.

त्यामुळे जिल्ह्यात चाराटंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थतेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही.

याकरिता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील उत्पादित होणारा चारा, मुरघास व एकूण मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास मनाई केली आहे. हा आदेश निर्गमित करण्यात आल्याच्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT