Animal Fodder : चाऱ्यासाठी काटेविरहित निवडुंग

Cactus Use : निवडुंगाचा वापर टंचाईच्या काळात हिरवी वैरण आणि जनावरांची पाण्याची गरज कमी करण्यासाठी होतो. शेतास कुंपण म्हणूनही निवडुंग लागवड करावी.
Animal Fodder
Animal FodderAgrowon
Published on
Updated on

डॉ. शिवाजी दमामे, डॉ. संदीप लांडगे, डॉ. भीमराज नजन

Planting cactus : अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी काटेविरहित निवडुंग (कॅक्टस) हा चांगला पर्याय आहे. काही निवडुंगाच्या जातींमध्ये काटे नसतात. या जाती अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहतात. निवडुंगाच्या शिफारशीत जातींची कमी पर्जन्यमानाच्या भागात तसेच मुरमाड, पडीक जमिनीमध्ये लागवड करून उत्तम प्रकारे चारा म्हणजे पानांचे उत्पादन घेता येते. काटेविरहित निवडुंग लागवड व्यवस्थापनासाठी अत्यंत कमी मनुष्यबळ, देखभाल खर्च लागतो. निवडुंगाचा वापर टंचाईच्या काळात हिरवी वैरण आणि जनावरांची पाण्याची गरज कमी करण्यासाठी होतो. शेतास कुंपण म्हणूनही निवडुंग लागवड करावी. अधिक पानांच्या उत्पादनासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, डोंगर उतार किंवा मुरमाड जमिनीची निवड करावी.

क्युरिंग आणि बेणे प्रकिया :
१) लागवडीसाठी १२७०, १२७१, १२८०, १३०८ या सुधारित जातींची निवड करावी. साधारणपणे ५ ते ६ महिने जुनी झालेली परिपक्व पाने देठापासून धारदार चाकूने कापून घ्यावीत. पाने सावलीमध्ये १० ते १५ दिवस सुकवावीत. ताजी कापलेली पाने ताडपत्री/चटईवर सुकविण्यास (क्युरिंग) ठेवावीत.
२) लागवडीनंतर कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्युरिंग केलेली पाने बोर्डो मिश्रण किंवा मॅन्कोझेब दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी या द्रावणात एक एक करून बुडवून घ्यावीत.

Animal Fodder
Bajara Fodder Crop : हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी ची लागवड कशी करावी?

लागवडीचे तंत्र :
१) लागवडीसाठी तीन बाय दोन किंवा दोन बाय दोन मीटर अंतरावर एक बाय एक फूट आकाराचा अर्धा फूट खोल खड्डा घ्यावा.
२) खड्ड्यांमध्ये साधारणपणे १ किलो चांगले कुजलेले शेणखत मातीमध्ये मिसळावे. लागवड करताना सुकविलेल्या पानांचा पसरट भाग पूर्व-पश्‍चिम ठेवून लागवड करावी.
३) लागवड करताना १/३ भाग जमिनीत राहील याची काळजी घ्यावी. लगतची माती चांगली दाबून द्यावी. साधारणतः हेक्टरी २ ते २.५ हजार पाने लागतात.
४) पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांत लागवड करावी. कारण या हंगामामध्ये याची जास्तीत जास्त पाने जगतात.
५) या पिकास रासायनिक खतांची गरज खूप कमी प्रमाणात लागते. पीक लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश द्यावे. चाऱ्यासाठी याची पाने कापणी केल्यानंतर दर वेळी २० किलो नत्राची प्रति हेक्टरी मात्रा द्यावी.
६) हे कमी पाण्यात येणारे पीक आहे. एक वर्षांपर्यंत २० ते ३० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.


Animal Fodder
Cactus Fodder : जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून काटेविरहित निवडुंगाचा वापर?

काटेविरहित निवडुंगाच्या पानांमधील घटक ः
१) ८० ते ९० टक्के पाणी, ८ ते १० टक्के शुष्क पदार्थामध्ये प्रथिने ४ ते ९ टक्के.
२) तंतुमय पदार्थ ६ ते ११ टक्के, ६० ते ८० टक्के कर्बोदके.
३) जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आदी खनिजांचे भरपूर प्रमाण.


कापणी आणि उत्पादन ः
१) चांगल्या पौष्टिक चाऱ्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या पानांची कापणी करावी. एक वर्षानंतर साधारणतः प्रत्येक झाडावर ८ ते १० नवीन पाने येतात (१२ ते १५ किलो) तेव्हा त्याची चाऱ्यासाठी कापणी करावी.
२) खालची १ ते २ पाने तशीच ठेवून बाकीच्या पानांची कापणी करावी. कापलेल्या पानांचे धारदार कोयत्याने बारीक तुकडे करावेत. तुकडे १:३ प्रमाणात कोरड्या चाऱ्या सोबत द्यावेत.
३) शेळी, मेंढीला तुकडे केलेली ५ ते ६ पाने आणि गाय, म्हशीला तुकडे केलेली १० ते १२ पाने या प्रमाणात चाऱ्यात मिसळून द्यावे.
४) एका झाडापासून एका वर्षात १० ते १५ किलो उत्पादन.


संपर्क ः डॉ. शिवाजी दमामे, ८२७५५९२२६२
(अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com