Jalana News : महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-२००९ अन्वये वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला आहे. त्यात जिल्ह्यातील एकूण ६८ गावे टंचाईग्रस्त दर्शविली आहेत.
जिल्ह्यातील या टंचाईग्रस्त ६८ गावात ३१ जुलै २०२५ पर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्भवावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या विहिरीमधील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली, असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
जालना जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ पर्यंत टंचाई भासणारी गावे जालना तालुक्यातील गणेशपूर, नाव्हा, सोमनाथ, वरुड, तर परतूर तालुक्यातील चांगतपुरी, गोळेगाव, कनकवडी, लोणी खु, सातारा वाहेगाव, सावंगी गंगा किनारा आणि सावरगाव बु. एकूण ११ गावांचा टंचाई भासणाऱ्या गावांचा समावेश आहे.
जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत अंबड तालुक्यातील अंतरवाला अवा, अवा, बदापूर, चिकनगाव, देशगव्हाण, माहेर भायगाव, बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव, नानेगाव, वाकुळणी, माळेगाव खु, भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारु, हसनाबाद, टाकळी बाजड, आणि जाफ्राबाद तालुक्यातील देऊळगाव उगले, कुंभारी, मेरखेडा, वरखेडा भालकी, कुंभारझरी तसेच निवडुंगा या एकूण १९ गावांचा टंचाई भासणाऱ्या गावांचा समावेश आहे.
एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत अंबड तालुक्यातील डोमलगाव, रामगव्हाण बु, टाका, वडीगोद्री, बदनापूर तालुक्यातील बावणेपांगरी, डावरगाव, तळणी लोधेवाडी, देवगाव, कडेगाव, कस्तुरवाडी, कुसळी, रोशनगाव , वरुडी, भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड, खडकी, लतीफपूर,
टाकळी हिवर्डी, तळेगाव, जाफराबाद तालुक्यातील खानापूर, नांदखेडा, वरखेडा फिरंगी, जालना तालुक्यातील भाटेपुरी, खणेपुरी, लोंढ्याची वाडी, मजरेवाडी, साळेगाव जालना, गवळी पोखरी, नंदापूर, थार, पोखरी सिंदखेड, वाघ्रुळ जहाँगीर आणि मंठा तालुक्यातील देवठाणा उस्वद, इंचा कानडी आणि टाकळखेपा अशा एकूण ३८ गावांचा टंचाई भासणाऱ्या गावांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.