Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Morna Dam : धरण उशाला व कोरड घशाला, अशी अवस्था होण्याआधी सांगली पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,’ अशी मागणी होत आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Sangli News : ‘पाऊण टीएमसी पाणीसाठा व शिराळा शहरानजीक असलेले मोरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले तरी रब्बी हंगामातील पिके व उसासाठी धरण ते मांगलेपर्यंत शेतकऱ्यांनी पाणीउपसा सुरू केल्याने चार-पाच दिवसांपासून नदीपात्र कोरडे पडू लागले आहे.

धरण उशाला व कोरड घशाला, अशी अवस्था होण्याआधी सांगली पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,’ अशी मागणी होत आहे.

Water Crisis
Water Crisis : मराठवाड्यातील आठ लघू प्रकल्प अजूनही कोरडेच

शिराळा तालुक्यात सरासरीहून अधिक पाऊस झाल्याने व परतीच्या तसेच मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तालुक्यात १०० टक्के पाणीसाठा झाला. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला.

शिराळा शहरानजीक असलेले ७४७.९४ दलघफू क्षमतेचे मोरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात ५८४.०७ दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे. मोरणा धरणातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी २० गावे पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे.

Water Crisis
Water Crisis : खानदेशात टँकरची समस्या दूर

नोव्हेंबरमध्ये नदी प्रवाहित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. पावसाळ्यापासून ते १० तारखेपर्यंत नदी प्रवाहित होती. मात्र पावसाने पूर्णतः उघडीप दिल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी उभा ऊस, नवीन सुरूच्या लागणी व रब्बीतील पिकासाठी पाणी उपसा सुरू केल्याने नदीपात्र चार-पाच दिवसांपासून कोरडे पडू लागले. शेतीला पाण्याचा तुटवडा भासत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

धरण लाभक्षेत्रातील गावे

जलाशयातील ः शिराळा, एम. आय. डी. सी. तडवळे, उपवळे, अंत्री खुर्द, अंत्री बुद्रुक, पाडळी, पाडळेवाडी

धरणाखालील भाग

बिऊर, भाटशिरगाव, शिंगटेवाडी, जांभळेवाडी, धुमाळवाडी, चिखलवाडी, फकिरवाडी, इंग्रुळ, मांगले व शिराळ्याचा काही भाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com