Bhogavati River Agrowon
ॲग्रो विशेष

Panchganga, Bhogavati River : ‘पंचगंगा’, ‘भोगावती’च्या दोन्ही तीरांवर उद्यापासून उपसाबंदी

Irrigation Department : पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरांवरील भागांत शेतीसाठी पाणीउपसा करणाऱ्या उपसा यंत्रांवर ४ ते ६ जून २०२३ या कालावधीत उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरांवरील भागांत शेतीसाठी पाणीउपसा करणाऱ्या उपसा यंत्रांवर ४ ते ६ जून २०२३ या कालावधीत उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत.

भोगावती नदीवरील राधानगरी धरण ते शिंगणापूर उर्ध्व बाजू, राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरांवरील भाग, तुळशी धरणापासून ते बीड को.प.बंधाऱ्यापर्यंतचा भाग, कुंभी धरणापासून भोगावती नदी संगमापर्यंतचा भाग, कासारी धरणापासून प्रयाग चिखली संगमापर्यंतचा भाग या नमूद केलेल्या नदीवरील भागांत मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यांवरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरांवरील भाग या ठिकाणी उपसाबंदी करण्यात येणार आहे.

बंदी कालावधीत पाण्याचा अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवानाधारकाचा परवाना १ वर्षासाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असेही बांदिवडेकर यांनी कळविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT