Professional Opportunities Agrowon
ॲग्रो विशेष

Cereals Professional Opportunities : तृणधान्याच्या माध्यमातून व्यावसायिक संधीद्वारे प्रगती

Cereal Sale : तृणधान्याच्या विक्रीसह मूल्यवर्धन केल्यास अनेक व्यावसायिक संधी निर्माण होऊन प्रगती साधता येऊ शकते, असा सूर मान्यवरांच्या चर्चेतून समोर आला.

Team Agrowon

Nashik News : बदलती जीवनशैली व बदलत्या आहारामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र आरोग्यवर्धक पौष्टिक तृणधान्यांच्या नियमित आहारातील समावेशाने मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळविता येते. त्यामुळे तृणधान्याच्या विक्रीसह मूल्यवर्धन केल्यास अनेक व्यावसायिक संधी निर्माण होऊन प्रगती साधता येऊ शकते, असा सूर मान्यवरांच्या चर्चेतून समोर आला.

‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ व ‘श्री अन्न निरंतर’या संकल्पनेअंतर्गत नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन बुधवारी (ता. १४) करण्यात आले होते. यामध्ये तांत्रिक चर्चासत्रांसह विविध उपक्रम पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया होते.

तर इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, आहारतज्ज्ञ डॉ. अनंत पाटील, कृषी उद्योजक तात्यासाहेब फडतरे, शशिकांत बोडके, तृणधान्य उत्पादक शेतकरी रामसिंग वळवी (अक्कलकुवा, जि. नंदुरबार), सेंद्रिय कृषिभूषण शेतकरी यशवंत गावंडे, नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक मोहन वाघ, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी सुनील वानखेडे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

राज्यातील कृषी विभागाचे पुरस्कारप्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकरी, ‘आत्मा’ गट, बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी व महिला शेतकरी, आहारतज्ज्ञ यांची उपस्थिती होती. तृणधान्यावर आधारित पाककृती, चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या वेळी सन्मानित करण्यात आले.

यात प्रत्येकी ४ कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, १ उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा समावेश होता. तसेच ‘आत्मा’ यंत्रणेचे तालुका व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, पोकरा योजनेतील समूह सहायक यांचाही सन्मान करण्यात आला.

१९९० पर्यंत मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग असे रुग्ण भारतात जास्त आढळून येत नव्हते. मात्र १९९० नंतर याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले. त्यामुळे आता येणारी पिढी सशक्त व निरोगी राहण्यासाठी आहारात तृणधान्यांचा समावेश करण्याची ही वेळ आता आली आहे.
डॉ. विशाल गुंजाळ, अध्यक्ष-इंडियन मेडिकल असोसिएशन (नाशिक शाखा)
छोट्या प्रकल्पांतून सुरुवात करून पुढे हळूहळू व्यावसायिक विस्तार करा. त्यातून स्वतःचा ब्रँड विकसित करून त्याचे यशस्वी मार्केटिंग करा.
शशिकांत बोडके, तृणधान्य प्रक्रिया उद्योजक
तृणधान्य मूल्यवर्धित उत्पादनांच्या मागणीमुळे प्रक्रियेला मोठा वाव आहे. त्यामुळे निर्यातीत ‘रेडी टू इट’ उत्पादनांना मागणी वाढत असल्याने संधी म्हणून पाहिले पाहिजे.
तात्यासाहेब फडतरे, तृणधान्य प्रक्रिया उद्योजक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT