Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Distribution : खरिपातील पीककर्ज वाटपास गती

Kharif Season : खानदेशात खरिपातील पीककर्ज वितरण जुलैच्या सुरुवातीला ६० टक्केही झाले नव्हते. परंतु मागील ३० ते ४० दिवसांत पीककर्ज वितरण गतीने झाले असून, वाटपाची टक्केवारी ७९ टक्क्यांवर आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात खरिपातील पीककर्ज वितरण जुलैच्या सुरुवातीला ६० टक्केही झाले नव्हते. परंतु मागील ३० ते ४० दिवसांत पीककर्ज वितरण गतीने झाले असून, वाटपाची टक्केवारी ७९ टक्क्यांवर आहे.

यंदा पीककर्ज वितरण ९० टक्क्यांपर्यंत होईल, अशी अपेक्षा आहे. खानदेशात सुमारे चार हजार कोटी रुपये पीककर्ज खरिपात वितरित करायचे आहे. खरीप हंगाम जूनमध्ये अधिकृतपणे आता सुरू झाला. जून महिना सुरू झाला तरीदेखील पीककर्ज वितरणाची गती संथ होती.

राष्ट्रीय बँका पीककर्ज वाटपात हात आखडता घेत होत्या. शेतकरी नव्या पीक कर्जाचे प्रस्ताव घेऊन बँकेत जात होते. परंतु बँका शेतकऱ्यांना शाखेत सहकार्य करीत नाहीत. बँक शाखांमध्ये कर्मचारी संख्या कमी आहे, शाखाधिकारी, व्यवस्थापक नसतात, यामुळे प्रस्तावावर निर्णय होत नाही. नवे बँक खाते संबंधित बँकेत उघडले जात नसल्याची स्थिती, अशा तक्रारी होत्या. परंतु या महिन्यात पीक कर्जाचे सात हजारांपेक्षा अधिकचे प्रस्ताव मार्गी लागले आहेत.

जळगाव जिल्ह्यात सुमारे २८०० कोटी, धुळ्यात ५०० आणि नंदुरबारात ७०० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे आहे. गेल्या वर्षी पीककर्ज अखेरपर्यंत ७५ टक्केच वितरित झाले होते. जळगाव जिल्ह्यात सुमारे ८० टक्के पीककर्ज वितरण झाले आहे.

धुळे व नंदुरबारातही प्रत्येकी ४८० कोटींवर पीककर्ज वितरण झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा बँक पीककर्ज वाटपात आघाडीवर आहे. धुळे व जळगाव जिल्हा बँकेने यंदा लक्ष्यांकापेक्षा अधिकचे पीककर्ज वितरण केले आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT