Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Productivity : बीडमध्ये जिरायती कापूस रुईची हेक्टरी ३४० किलो उत्पादकता

Cotton Farming : खरीप हंगामात बीड जिल्ह्यात सरासरी सात लाख ८५ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रापैकी सात लाख ८२ हजार ३००८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Beed News : जिल्ह्यात कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी जिरायती कापसाची हेक्टरी ३४० किलो तर बागायती कापूस रुईची हेक्टरी ४३४.३५ किलो तर तुरीची हेक्टरी ९ क्विंटल ११ किलो उत्पादकता आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

खरीप हंगामात बीड जिल्ह्यात सरासरी सात लाख ८५ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रापैकी सात लाख ८२ हजार ३००८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. अंतिम पेरणी अहवालानुसार, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ९९.५६ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती.

पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी तुरीची पेरणी सरासरी ५३,२३७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४८ हजार ६४८ हेक्टर क्षेत्रावर झाली होती. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९१.३८ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेल्या तूर पिकाची उत्पादकता काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगानुसार जिल्ह्यात हेक्टरी ९ क्विंटल ११ किलो तुरीची उत्पादकता आली.

जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५५ हजार ४९३ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ६९ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. लागवड झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७५.८४ टक्के इतके होते.

कापसाच्या पिकाची उत्पादकता काढण्यासाठीही पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले. राबविण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगानुसार जिरायती कापूस रुईची हेक्टरी ३४० किलो तर बागायत कापूस रुईची ४३४ किलो प्रती हेक्‍टरी उत्पादकता आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

४ लाख २५ हजार हेक्टरवर रब्बी पीक

बीड जिल्ह्यात रब्बीचे सरासरी पेरणी क्षेत्र ३ लाख ३२ हजार ३५३ हेक्टर असून प्रत्यक्षात ४ लाख २५ हजार २१२ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२७ टक्के इतकी आहे. गत दोन-तीन दिवसांत जिल्ह्यात ढगाळ वातावरण व काही ठिकाणी अल्प प्रमाणात अवकाळी पाऊस (Rain) पडला. परंतु या पावसाने शेतीपिकांचे नुकसान केले नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

२५८८ हेक्टरवर उन्हाळी पीक

बीड जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७४५५ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत आतापर्यंत २५८८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये मका ३८८ हेक्टर, उन्हाळी बाजरी १११७ हेक्टर, उन्हाळी भुईमूग ३३० हेक्टर तर उन्हाळी सोयाबीन २५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT