Cotton and jute : कापूस आणि तागाचे भाव एमएसपीच्या खाली आल्यास खरेदी करणार : गोयल

Union Minister Piyush Goyal : देशातील ताग आणि कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी घोषणा केली आहे. ताग आणि कापूस पिकाची किंमत हमीभावापेक्षा (एमएसपी) कमी झाल्यास सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करेल असे म्हटले आहे.
Piysh Goyal
Piysh Goyal Agrowon

Pune News : देशातील लोकसभा निवडणूका आणि दिल्लीच्या सिमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची धार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना खूश करणाऱ्या अनेक घोषणा केंद्र सरकार करत आहे. यादरम्यान केंद्र सरकारने ताग आणि कापूस पिकावरून घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी, ताग आणि कापूसाचे दर हमीभावापेक्षा (एमएसपी) खाली गेल्यास शेतकऱ्यांकडून ताग आणि कापूस सरकार खरेदी करेल, असे म्हटले आहे. गोयल यांनी ही घोषणा नवी दिल्ली येथे बुधवारी (ता.०६) वस्त्रोद्योग क्षेत्रातील लाभार्थ्यांशी संवाद साधताना केली. यावेळी वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना विक्रम जरदोश आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला देशभरातील ३९८ केंद्रांवरून हातमाग, हस्तकला, ​​ज्यूट, रेशीम यासह विविध क्षेत्रातील सुमारे १० हजार लाभार्थी सहभागी झाले होते. 

ताग आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पिके बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) खाली आल्यास सरकार खरेदी करण्यास तयार आहे. ताग आणि कापसाचे उत्पादन वाढविण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील आहे आणि परदेशात निर्यात वाढण्यासाठी दर्जेदार उत्पादन वाढीवर लक्ष दिले जात आहे. यासाठी दर्जेदार बियाणे, खतेही देण्यास सरकार तयार असल्याचेही गोयल म्हणाले. तसेच आमची उत्पादने जागतिक स्तरावर जावीत, असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे. 

Piysh Goyal
Minister Piyush Goyal : गहू, तांदूळ, साखर निर्यातबंदीवरून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे मोठे विधान; म्हणाले, 'सरकारचा कोणताही....'

देशातील कापड उत्पादन वाढण्याचा थेट फायदा हा उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी निर्मितीवर होईल. तर देश 'आत्मनिर्भर' बनवण्यात या कापूस आणि तागाची महत्वाची भूमिका असेही गोयल म्हणाले. तसेच त्यांनी, कारागिरांना त्यांचे व्यवसाय सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) वर नोंदणी करण्याचे आवाहन केले. पीयूष गोयल म्हणाले, हस्तकला आणि हातमागांशी संबंधित सर्व कारागीर आणि विणकरांना कोणत्याही नोंदणी शुल्काशिवाय सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) वर नोंदणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Piysh Goyal
Cotton Market : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ९ लाख क्विंटल कापूस खरेदी

पुढे गोयल म्हणाले, ई-मार्केटप्लेसवर नोंदणी केल्याने कारागिरांची दृश्यमानता वाढेल आणि त्यांचे उत्पन्न वाढवणाऱ्या व्यवसायांना चालना मिळण्यास मदत होईल. सरकार सरकारी ई-मार्केटप्लेस नोंदणीकृत व्यवसायांना देशातील प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सवर समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे परदेशी वेबसाइटवर देखील कारागिरांना आणि हातमागांना त्यांचे व्यवसाय नोंदणी करण्यासाठी प्राधान्य मिळेल. हस्तकला आणि हातमाग व्यवसायांना, विशेषत: लहान उद्योगांना सरकारी ई-मार्केटप्लेस वेबसाइटवर त्यांच्या हस्तकलेद्वारे ओळख निर्माण करण्यास मदत करेल, असा दावाही गोयल यांनी केला.

कारागीर आणि विणकरांचे जीवन सुसह्य होण्यासह त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्राने तांत्रिक नवोपक्रमासाठी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन गोयल यांनी केले आहे. तसेच देशाच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण केल्याबद्दल गोयल यांनी लाभार्थ्यांचे आभार मानले आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com