Cotton Market : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ९ लाख क्विंटल कापूस खरेदी

Cotton Procurement : या दोन जिल्ह्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून जाहीर लिलावाव्दारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Parbhani News : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गत शुक्रवार (ता. १) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्या अंतर्गत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून ८ लाख ७७ हजार ६७१ क्विंटल व भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)च्या ६ केंद्रांवर ६७ हजार ९९५ क्विंटल मिळून एकूण ९ लाख ३२ हजार ६८२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

या दोन जिल्ह्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून जाहीर लिलावाव्दारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, ताडकळस या ९ बाजार समित्या अंतर्गत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये ८ लाख ७ हजार ९२८ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

Cotton Market
Cotton Market : कापसाला मार्चमध्ये काय भाव मिळेल? कापसाचा सरासरी भाव कितीवर पोचला; आवक किती झाली होती ?

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व आखाडा बाळापूर बाजार समित्या अंतर्गतच्या ४ जिनिंग कारखान्यांमध्ये ५६ हजार ७५९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. दोन जिल्ह्यांतील ४३ जिनिंग कारखान्यांत ८ लाख ६४ हजार ६८७ क्विंटल कापूस खरेदी झाली.

Cotton Market
Cotton Market : कापूस बाजारात तेजीचे वारे

भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआयची) परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, ताडकळस या ५ केंद्रांवर एकूण ६३ हजार १० क्विंटल व हिंगोली जिल्ह्यातील शिरडशहापूर (ता. औंढा नागनाथ)येथील केंद्रावर ४ हजार ९८५ क्विंटल कापूस खरेदी झाली. दोन जिल्ह्यातील ६ केंद्रावर ६७ हजार ९९५ क्विंटल कापसाची खरेदी झाली अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

खासगी कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

बाजार समिती...जिनिंग संख्या...कापूस खरेदी

परभणी...७...११८४७५

जिंतूर...४...११९४७४

बोरी...१...३७२४४

सेलू...६...१८८२६५

मानवत...१३...२६२४१८

पाथरी...२...१३१२५

सोनपेठ...१...२२९५४

गंगाखेड...३...१३६९३

ताडकळस...२...३२२८०

हिंगोली...३...५२५८४

आखाडा बाळापूर...१...४१७५

सीसीआय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण...कापूस खरेदी

जिंतूर...१३५६९

बोरी...११७५४

सेलू...१६७८०

मानवत...२०१९३

ताडकळस...७१४

शिरडशहापूर...३७०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com