Coconut Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Coconut Cultivation : नारळ लागवडीतून उत्‍पादन वाढ

Coconut Yield : मुरूड पंचायत समिती कार्यालयाला समुद्रकिनाऱ्यालगत लागवड केलेल्‍या नारळाच्या झाडांपासून दोन ते तीन लाख रुपयांचे त्रैवार्षिक उत्पन्न मिळत आहे.

Team Agrowon

Murud News : मुरूड पंचायत समिती कार्यालयाला समुद्रकिनाऱ्यालगत लागवड केलेल्‍या नारळाच्या झाडांपासून दोन ते तीन लाख रुपयांचे त्रैवार्षिक उत्पन्न मिळत आहे. या परिसरात यंदा सुधारित जातीच्या माडाची रोपे लावल्याने पुढील चार वर्षांत उत्पन्नात निश्चित वाढ होईल, असा विश्वास मुरूड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ यांनी व्यक्त केला.

मुरूड पंचायत समितीसह दरबार हॉल, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र निवासस्थान, जिल्हा परिषद विश्रामगृह, पशुधन विकास अधिकारी कार्यालये समुद्रालगत आहेत. जवळपास पाच एकर जागेत १०० हून अधिक नारळाची झाडे लावण्यात आली असून ८० ते ९० फूट उंचीची ही झाडे वर्षानुवर्षे फळे देतात.

त्रैवार्षिक लिलावातून सरकारला माडाच्या झाडांपासून दोन लाख ९७ हजार रुपये इतके उत्पन्न मिळत आहे. लिलाव पद्धतीत शहाळीविक्रेते बोली बोलतात. जो जास्तीत जास्त बोली लावेल, त्यांना लिलाव दिला जातो. प्रत्‍येक सरकारी कार्यालयाच्या आवारात नारळासारखी उत्पन्न देणारी झाडे लावली, तर तिजोरीत निश्‍चितच भर पडेल.

शिवाय पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल, असे पर्यावरणप्रेमींचे म्‍हणणे आहे. यंदा माझी वसुंधरा अभियानांतर्गत परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून दरबार हॉल व पंचायत समिती कार्यालयासमोर सुधारित प्रजातीच्या नारळाच्या झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांपासून तीन-चार वर्षांत उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. लागवड केलेल्‍या झाडाची निगा राखण्याची जबाबदारी त्‍या त्‍या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

सुधारित वाणाचा अवलंब

मुरूड हे पर्यटन केंद्र असल्‍याने शेती, फळ लागवडीवर भर देणे आवश्‍यक आहे. योग्य प्रमाणात खत-पाणी दिल्याशिवाय चांगली फळधारणा होत नाही. पारंपरिक वाणापेक्षा शेतकऱ्यांनी सुधारित वाणांचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

मुरूड तालुक्यामध्ये नारळाच्या लागवडीखालील क्षेत्र २७५ हेक्टर असून बाणवली वाणाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. कृषी विभागातर्फे नारळ पिकाचे क्षेत्र वाढविण्याकरिता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तसेच दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या लाभार्थ्यांकरिता भाऊसाहेब फुंडकर योजनेमधून अनुदान देण्यात येते; परंतु सध्या नारळापेक्षा सुपारी पिकामध्ये शेतकऱ्यांना जास्त नफा मिळत असल्याने शेतकऱ्यांचा सुपारी पिकाकडे कल वाढत आहे; तरी शेतकऱ्यांनी कोकणची ओळख म्हणून नारळ पीक लागवडीकडे वळावे.
मनीषा भुजबळ, तालुका कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PESA Mobilisers Jobs: पेसा मोबिलायझर्सची पदे रद्द करू नका; केंद्रीय मंत्र्यांकडे संघर्ष समितीची मागणी

Kharif Fertilizers Approved: खरिपासाठी पुणे जिल्ह्यात १.९४ लाख टन खते मंजूर

Kharif Season Planning: उद्दिष्टपूर्ती नव्हे, तर उत्पादन वाढीसाठी नियोजन करा: कृषी सचिव परिमल सिंह

Shaktipeeth Highway March: शक्तिपीठ महामार्गाविरोधात ९ जूनला कोल्हापुरात मोर्चा

Diesel Shortage: डिझेलसाठी शेतकरी बारा तास रांगेत

SCROLL FOR NEXT