.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे या भागातील अनेक पूल पाण्याखाली गेले. तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे बांदा बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण झाला आहे. भेडशी (ता. दोडामार्ग) येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
जिल्ह्यात मंगळवारी (ता. ३०) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी पहाटे काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. परंतु बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.
परंतु रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे बांदा शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. येथील भेडशी पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे दोन वाहने अडकली. या दोन वाहनांमधील चार प्रवासी पुराच्या पाण्यात अडकले होते. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी या चौघांना सुरक्षित बाहेर काढले.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार झाले. चराठे येथील एक घर कोसळून दोन जण जखमी झाले. कणकवली, वैभववाडी आणि कुडाळ तालुक्यांत देखील रात्रभर पावसाच्या सरी कोसळत आहेत.
जिल्ह्यात गुरुवारी (ता. १) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत देवगडमध्ये २४.८ मिमी, मालवण ३५, सावंतवाडी १२३.१, वेंगुर्ला ८५.८, कणकवली ५५.२, कुडाळ ५६४.९, वैभववाडी ४८, दोडामार्गमध्ये १५४.६ मिमी पावसाची नोंद झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.