Coconut Water : पारा वाढताच नारळ पाण्याला मागणी

Summer Heat : पालघर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे.
Summer Heat
Summer HeatAgrowon

Palghar News : पालघर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. उन्हाळा वाढला असल्याने फळांची मागणीदेखील चांगलीच वाढली आहे. त्यामुळे बाजारात फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहेत.

विविध रुग्णालये, रेल्वे स्थानके, बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात नारळ पाण्याची विक्री होताना दिसत आहे. विविध थंड पेये, आइस्क्रीमच्या या जमान्यातही नारळ पाण्याला मागणी वाढतच आहे.

नारळ पाणी म्हणजे निसर्गातील शुद्ध पाणी. या पाण्याला वर्षभर मागणी असते; पण सध्या रमजान, तसेच मुलांच्या परीक्षांचा काळ सुरू आहे. उन्हाळ्यात जास्त तहान लागत असल्याने ती भागवण्यासाठी थंडगार पाणी, लिंबू पाणी, फळांच्या रसाची मागणी होत आहे.

Summer Heat
Summer Heat : उन्हाळ्यातील विविध आजारांवर गुणकारी वाळा

मात्र, स्वच्छ, तसेच कुठलीही भेसळ नसणारे पेय म्हणजे नारळ पाणी. नारळपाणी केवळ तहान भागवत नाही, तर उन्हाळ्याने ‘डिहायड्रेड’ झालेल्या शरीरात नवी तरतरी भरते. यामुळे चवीला काही प्रमाणात नारळ पाण्याला मागणी मोठी आहे. नारळ पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, अमिनो ॲसिड, एंझाईम्स हे घटक आढळतात.

Summer Heat
Summer Heat Update : उन्हाच्या चटक्याने विदर्भ भाजला

पालघर परिसरात अनेक बागा

डहाणू, वाणगाव, बोर्डी, कासा, गंजाड, आशागड परिसरात नारळाच्या अनेक बागा असून यातून नारळ विक्रेतेही तेथे थेट खरेदीसाठी जातात. विक्रेत्यांना १२ ते १५ रुपयांपर्यंत जागेवर शहाळे मिळते, मात्र सामान्य ग्राहकांना ३० ते ४० रुपयांपर्यंत विक्री केली जाते. यामध्ये शहाळे झाडावरून उतरवणे, ते वाहनात वाहून नेण्याचा खर्च असतो.

नारळ पाणी प्यायल्यामुळे तहान भागण्यासोबत त्यातील पोषक तत्त्वांमुळे शरीराला फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे गरम झालेल्या शरीराला आतून गार ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यायचा सल्ला देतात.
- चिन्मय पालांडे, ग्राहक.
आजारी पडल्यावर अनेक जण शहाळे पितात; पण आजारी नसतानाही दररोज शहाळे पिल्यास कोणत्याही अन्य औषधांची गरज पडत नाही, म्हणून निदान उन्हाळ्यात याचा आस्वाद घेतला पाहिजे.
- डॉ. प्रदीप धोडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com