Modern Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Modern Agriculture Technology : आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावे

Latest Agriculture News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध पिकात संशोधन करून अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केले आहे.

Team Agrowon

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध पिकात संशोधन करून अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल पद्धतीने शेतीसाठी पाण्याचा वापर तसेच शेतीचे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी विविध मोबाइल अॅपची निर्मिती यांचा समावेश आहे. शेतीसाठी यंत्रमानव निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.

त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे शेतीमधील कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकरी बांधवांनी विद्यापीठाच्या या अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करून पीक उत्पादन वाढवावे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्यानंतर डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात विद्यापीठातील शास्त्रज्ञांबरोबर संवाद साधला.

संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे, कडधान्य सुधार प्रकल्पाचे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायाळ, कोल्हापूर येथील अ.भा.स. नाचणी व इतर तृणधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश बन, यांच्यासह पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. गोरंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांनी आधुनिक सिंचन पध्दतीचा अवलंब करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर त्यांनी अशाच प्रकारे विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी समन्वय साधला तर त्यांच्या शेतीविषयक प्रश्नांची सोडवणूक करता येईल.

शेतीसाठी यंत्रमानव निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे शेतीमधील कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल पद्धतीने शेतीसाठी पाण्याचा वापर तसेच शेतीचे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी फायदा होत आहे.

या वेळी डॉ. पंडित खर्डे यांनी विद्यापीठाच्या विविध प्रकाशनांबाबत तसेच विद्यापीठ राबवीत असलेल्या शेतकरी प्रथम प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. योगेश बन यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील पाणी फाउंडेशनाच्या फार्मर कपचे ४२ शेतकरी गटातील २८० शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. सकाळच्या सत्रात त्यांनी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांना भेटी देऊन माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT