Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton : पांढऱ्या सोन्याचा रंग बदलणार? आता कोणता रंगाचा असेल कापूस?

Discussion of blue cotton : वस्त्रोद्योगात विविध रासायनिक रंगांचा वापर केला जातो. या रंगाच्या वापरामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. तसेच त्या रंगांचा मानवी जीवनावरही विपरीत परिणाम दिसून येतो. सध्या हे टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीडसह अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांकडून कापूस पिकवला जातो. त्यामुळे या भागातील मोठी ग्रामीण अर्थव्यवस्था ही कापशीवर अवलंबून आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहे. पण आता आपल्या राज्यातील या पांढऱ्या सोन्याचा रंग बदलणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

आपल्या राज्यासह देशाचा इंग्रज काळातील इतिहास पाहिला असता आत्ताचा दिसणारा पांढरा कापूस असा नव्हता. त्याच्या अनेक जाती होत्या. त्यामुळे त्याचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात येथे केले जात असे. आंध्र प्रदेशच्या बाबतील बोलायचे झाल्यास येथून १९५० पर्यंत जपानला खाकी रंगाच्या कापसाची निर्यात होत होती. तसे संदर्भ आणि नोंदी आहेत. पण आता निळ्या कापसावर चर्चा आहे.

निळ्या कापसावर चर्चा सुरू असतानाच संशोधक कापसाची निळी जात विकसित करत असल्याचेही समोर येत आहे. तसेच कापसाची निळी जात विकसीत झाल्यास हा क्रांतिकारक शोध ठरू शकतो. तसेच तसे झाल्यास हा फोर लोकप्रिया ही ठरेल. त्यामुळे संशोधकांकडून अशा जातीचा शोध घेतला जात आहे. तसेच यासाठी नीळ पिकाच्या जनुकांचा वापर नव्या कापूस जातीत केला जाऊ शकतो का याचा अभ्यास केला जात आहे.

रंगीत कापसाच्या ४० जाती

पांढऱ्या कापसाला पर्यायासह त्याचे उत्पादन वेगवेगळ्या रंगात घेण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. त्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून यात अनेक बदल झाले आहेत. अनेक नव्या वाणांची निर्मिती झाली आहे. तर अख्या जगात शुद्ध पांढरा आणि लांब धाग्याचा असणाऱ्या कापूसाचा बोलबोला आहे. त्यालाच मागणी देखील अधिक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या शेतात सध्या बीटी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचा कापूस दिसत नाही. मात्र केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे रंगीत कापसाच्या सुमारे ४० जाती आहेत. तर संस्थेकडे कापसाच्या ६००० जातीही आहेत.

सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे रंगीत कापसाच्या ४० जाती आहेत. तर आपल्या राज्याच्या नागपूरस्थित सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटकडे देखील तपकिरी धाग्याची कापसाची जात आहे. ही जात वैदेही ९५ नावाची आहे.

नव्या संशोधनाची गरज काय?

वस्त्रोद्योगात विविध रासायनिक रंगांच्या वापर वाढत असल्याने त्याचा घातक परिणाम दिसत आहे. ज्यामुळे रंगात हात घालणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी नव्या रंगाच्या कापसाचा शोध घेतला जात आहे.

राखाडी, पिवळा, केशरी आणि गुलाबी रंगाचा कापूस

सध्या आपल्याकडे वस्त्रोद्योगातात निर्माण होणाऱ्या विविध समस्या आणि आजारांमुळे नव्या रंगाच्या कापसाकडे लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी संशोधन केले जात आहे. मात्र १९८० च्या दशकात अमेरिकन कंपनीने कापूसात मोठे संशोधन केले होते. ब्रीडर सॅली फॉक्स या कंपनीने आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर लांब सुत असणाऱ्या कापसाची जात विकसीत केली होती. या कंपनीने राखाडी, पिवळा, केशरी आणि गुलाबी अशा रंगांचे वाण तयार केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रात निळ्या कापसाचे वाण विकसित करण्याची तयारी सुरू झाली आहे.

रंगीत कापूस इतर देशात

१९८० च्या दशकात अमेरिकेत राखाडी, पिवळा, केशरी आणि गुलाबी अशा रंगांचे कापसाचे वाण तयार झाले होते. त्याप्रमाणे त्याचे इतर देशातही उत्पादन घेतले जाते. युनायटेड स्टेट्स, चीन, पेरू आणि इस्रायल या देशांमध्ये रंगीत कापूसाचे उत्पादन घेतले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT