Cotton Market : डिसेंबरपासून बाजारावर कापूस आवकेचा दबाव

Cotton Production : देशातील बाजारात चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये ११६ लाख गाठी कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केली. डिसेंबर महिन्यातील बाजारातील दैनंदीन आवक १ लाख ८० हजार गाठींवर होती.
Cotton
Cotton Agrowon
Published on
Updated on

Pune News : देशातील बाजारात चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये ११६ लाख गाठी कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केली. डिसेंबर महिन्यातील बाजारातील दैनंदीन आवक १ लाख ८० हजार गाठींवर होती. जानेवारीतही आवकेचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. नंतर मात्र बाजारातील आवक कमी होत जाईल, त्यामुळे कापसाच्या दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापुस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने जानेवारीचा आपला अंदाज जाहीर केला. सध्या कापूस निर्यात आयातीपेक्षा जास्त दिसते. डिसेंबरपर्यंत देशात ४ लाख गाठी कापूस आयात झाला तर निर्यात ५ लाख गाठींची निर्यात झाली. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे निर्यात जास्त दिसते. 

Cotton
Cotton Market : पांढऱ्या सोन्याचे काळे वास्तव

राज्यनिहाय कापूस आवकेचा विचार केला त आतापर्यंत गुजरातमधील शेतकऱ्यांनी सर्वाधिक ३२ लाख गाठी कापूस विकला. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी १९ लाख गाठी कापूस विकला. तेलंगणातील शेतकऱ्यांनीही १६ लाख गाठी कापूस विकला. वास्तविक शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीचे प्रमाण यापेक्षा जास्त असून शकते. कारण सर्वच कापसाची नोंद होत नाही, तसेच गावपातळी झालेल्या स्टाॅकची माहिती नसते. पण हा कापूस शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला असतो. 

जानेवारीतही चांगली आवक ?

जानेवारी महिन्यातही ५५ ते ६० लाख गाठी कापूस शेतकरी विकतील, असा अंदाज आहे. म्हणजेच पावणे १७५ ते २०० लाख गाठी कापूस बाजारात आलेला असेल. त्यानंतर १०० ते १२५ लाख गाठी कापूस शिल्लक राहील. त्यानंतर बाजारातील आवकही कमी होत जाईल. त्यामुळे बाजारात भावही वाढू शकतात. 

Cotton
Cotton Crop : कापूस पीक वर्षागणिक ठरतेय आतबट्ट्याचे

आयातफायदेशीर आहे का?

यंदा उत्पादन घटूनही भाव कमी आहेत. पुढील काळातही आयात करून भाव पाडले जातील, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. पण सध्या देशातील भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कमी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे क्विंटलचे भाव १७ हजारांच्या दरम्यान आहेत. तर देशातील भाव १५ हजार रुपयांपेक्षा काहीसे अधिक आहेत. म्हणजेच देशातील भाव जवळपास १० टक्क्यांनी कमी आहेत.

म्हणजेच आयात व्हायची असेल तर देशातील भाव वाढायला पाहीजे. कमी भाव असताना आयात जास्तच महाग पडेल. तसेच आयातीवर ११ टक्के शुल्क आहे. देशात अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची आयात होईल ती दरवर्षी होत असते. या कापसाची देशात टंचाई असते आयात करूनच या कापसाची गरज भागवली जाते. त्यामुळे सध्यातरी कापूस आयातीचा देशातील कापूस बाजाराला धोका नाही. उलट महाग आयात करायची असेल तर देशातील भावही वाढायला पाहीजे. ही वाढ फेब्रुवारीपासूनच दिसायला सुरुवात होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी दिला. 

आवकेचा भावावर परिणाम

- उत्पादन घटले, पण दैनंदीन आवकेचा दरावर परिणाम 
- ऑक्टोबर महिन्यातील दैनिक आवक ७८ हजार गाठी होती
- नोव्हेंबरमधील दैनिक आवक १ लाख १९ हजार गाठींवर पोचली
- नोव्हेंबरमधील कापूस आवक ऑक्टोबरच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढली 
- डिसेंबर महिन्यातील आवकेने १ लाख ८० हजार गाठींचा टप्पा गाठला
- डिसेंबर महिन्यातील आवक नोव्हेंबरच्या तुलनेत ५५ टक्क्यांनी वाढली होती. 
- नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील आवक उत्पादन कमी असूनही दरवर्षीप्रमाणेच राहीली 

कापासाची महिनानिहाय आवक

२४.३४ लाख गाठी
ऑक्टोबर

३६ लाख गाठी
नोव्हेंबर

५६ लाख गाठी
डिसेंबर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com