Digital School  Agrowon
ॲग्रो विशेष

Digital School : शाळा डिजिटल करण्याला प्राधान्य

आमदार भुयार : अभ्यासिकेच्या बांधकामाचे भूमिपूजन

टीम अॅग्रोवन.

मोर्शी, अमरावती : ‘‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ज्याच्याजवळ आहे तो गुरगुर करतो. आम्ही शाळा डिजिटल करण्याकरिता दहा कोटी रुपये आणले होते. परंतु निविदा उशिरा काढण्यात आल्यामुळे व सरकार पडल्याने हा निधी अडकला. निधी पुन्हा आणण्याच्या व जास्तीत जास्त शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न करू,’’ असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.

भारतरत्न अब्दुल कलाम अभ्यासिका व स्मशानभूमीच्या संरक्षणभिंतीच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सागर ढवळे, राकाँ गटनेता डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष मेघना मडघे, अप्पा गेडाम, मुख्याधिकारी रवी पाटील उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले म्हणाले, की इंग्रजी येत नाही म्हणून स्वतःला कमी लेखू नका, माझ्या दोन्ही मुली मराठी शाळेत शिकत आहेत. आई-वडिलांपेक्षा लहान मुले गुरुजनांचे जास्त ऐकतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे या शिक्षणाच्या दर्जावर जास्त भर द्यावा व जास्तीत जास्त निधी शाळेला देण्यात यावा.

बेंचेस, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खेळणी, शौचालय, क्रीडांगण या सोयी शाळांना पुरविण्यात याव्या, अशी विनंती आमदारांना केली. तहसीलदार सागर ढवळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की कामात कोणीही तक्रार करू नका, करीत असल्यास त्यांना समजून सांगा म्हणजे बरे होईल. नाहीतर काम अर्धवट पडेल.

या वेळी माजी शिक्षण सभापती डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे, अप्पासाहेब गेडाम, प्रीती देशमुख, कीर्ती चौधरी, सुनीता कोहळे, नितीन पन्नासे, नितीन उमाळे इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविक राजेश ठाकरे यांनी केले. या वेळी प्रकाश विघे, बंडू जिसकार, अशोक ठोंबरे, आनंद सदापुरे, विनोद ढवळे, अंकुश घारड, इरफान पठाण, नंदकिशोर पावडे, बंटी वाळके इत्यादी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT