अकोला : गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली ९ रोहित्र (Electric Transformer) सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने चार तास ठिय्या आंदोलन (Farmer Protest) केले. विद्युत विभागाकडून (Electricity Department) ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शुक्रवारी (ता. ४) रात्री आंदोलन मागे घेण्यात आले.
अडगाव विद्युत उपकेंद्रांतर्गत असलेल्या चांडक रोहित्र, नेमाडे रोहित्र, गजानन निमकर्डे रोहित्र, रघुनाथ निमकर्डे रोहित्र, बुढळकर रोहित्र, श्रीराम रोहित्र, नेमाडे रोहित्र, बुढळकर रोहित्र, बनारस रोहित्र, चितलवाडी फाटा रोहित्र व कांताबाई बगाडे रोहित्र ही नऊ रोहित्रं गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत.
याबाबत शेतकरी वारंवार विद्युत विभागाकडे जात होते. परंतु त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद न देता आधी तुमच्याकडील विद्युत बिल भरा, तरच तुमचे रोहित्र सुरू करण्यात येईल, अशी दमदाटी केली जात होती. अखेर या प्रश्नावर शुक्रवारी शेतकरी संघटना गाव प्रमुख अमोल मसुरकार यांच्या नेतृत्वात शंभरावर कार्यकर्त्यांनी विद्युत विभाग कार्यालयात चार तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी आमची सर्व बंद रोहित्र सुरू होत नाहीत तोपर्यंत आम्ही आपल्या कार्यालयातून उठणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेने कनिष्ठ अभियंता विशाल गावकरी यांच्यासमोर मांडली.
अडगाव येथील जळलेल्या ९ विद्युत रोहित्रांपैकी आठ रोहित्रे बुधवारसंध्याकाळपर्यंत तर उर्वरित एक रोहित्र शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बसवून देण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता विजय राठोड यांनी दिले. या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांच्या उपस्थितीत आंदोलन मागे घेण्यात आले.
लक्ष्मीकांत कौठकर, प्रमिलाताई भारसाकळे, कांताबाई बागडे, आशा नेमाडे, निता थुटे, वर्षा नेमाडे, नलू बाई मानमोडे, रेखा सातव, सेजल थुटे, किरण कौठकर, वीरा कौठकर, अमोल मसुरकर, नीलेश नेमाडे, गोपाल निमकर्डे, रमेश मानकर, दिनेश गिरे, रमकिशोर ठी, उमेश राहटे अशोक बागडे, विनोद मालगे, प्रवीण निमकर्डे, विक्की जलमकर, अमोल बंड, मंगेश रेळे, सोनाजी सताव, मंगळसिंग डाबेराव, मनोज रखोंडे, सोपान इंगळे, नागोराव मुरकर, रमेश तुमले, चेतन आसोले, दीपक बोमबटकर, श्रीराम ढोकणे, प्रभाकर ठोसर, सुनील आंबेकर, ढोकणे, मो. इर्फान, मकसुद मुल्लाजी, किशोर सातव, शेख इमरान उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.