Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : बँकांनी पतपुरठ्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा

Kharif Season : पीक कर्जासह अन्य शासकीय योजनांतर्गत कर्जाचे प्राप्त प्रस्तावांवर सर्वच बँकांनी प्राधान्याने व सकारात्मक दृष्टिकोनातून अंमलबजावणी करावी.

Team Agrowon

Sangli News : पीक कर्जासह अन्य शासकीय योजनांतर्गत कर्जाचे प्राप्त प्रस्तावांवर सर्वच बँकांनी प्राधान्याने व सकारात्मक दृष्टिकोनातून अंमलबजावणी करावी. बँकांना पतपुरवठ्याचे दिलेले उद्दिष्ट त्यांनी विहित वेळेत पूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.

जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे अंचलिक प्रबंधक पुनित द्विवेदी, रिझर्व बँकेचे अधिकारी राजेंद्र कानीशेट्टी, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक महेश पाटील, विविध शासकीय विभागांचे प्रमुख, विविध विकास महामंडळांचे व्यवस्थापक, बँकांचे समन्वयक उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत बँकांनी केलेल्या कर्जवाटपामुळे सांगली जिल्हा देशात तृतीय स्थानी आल्याबद्दल संबंधित विभागाचे अधिकारी व योगदान देणाऱ्या बँक प्रतिनिधींचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, की जिल्हा वार्षिक पतपुरवठा योजना सन २०२४-२५ अंतर्गत सर्व क्षेत्राखालील लाक्षांकाच्या १०६ टक्के म्हणजेच रक्कम रुपये २३ हजार १८७ कोटी वाटप झाले आहे. त्यापैकी प्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रुपये ११ हजार ४९५ कोटी तर अप्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रूपये ११ हजार ६९३ कोटी वाटप झाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व बचत गटासाठीचे कर्ज वाटपाचे लक्षांक पूर्ण झाले आहे.

दरम्यान, कृषी व तत्सम क्षेत्रे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी पीककर्ज वाटप यांसह अन्य प्राथमिक व अप्राथमिक क्षेत्रांकरिता विभागवार, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व विविध महामंडळांतर्गत पतपुरवठा योजनांतर्गत कर्जवाटपाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरात अपवाद वगळता मतदान शांततेत

Organic Farming: पीक उत्पादन स्थिरतेमध्ये जैविक घटक बायोमिक्स महत्त्वाचे

PM Kisan Yojana: पीएम किसानचे ४१६ कोटी शेतकऱ्यांकडून केले वसूल; अपात्र शेतकऱ्यांना दणका

Mushroom Farming: टेरेसवर कमी खर्चातील मशरूम शेती  

Crop Insurance: दीर्घ पाठपुरावा, अल्प दिलासा

SCROLL FOR NEXT