Crop Loan : सांगली जिल्ह्यातील ४३ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वितरित

Kharif Season 2025 : यंदा खरिपासाठी सांगली जिल्हा बॅंकेसाठी ९३ हजार ३६७ शेतकऱ्यांना ११३३ कोटी ५६ लाख इतके लक्षांक आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली असून कर्ज वितरणही सुरू झाले आहे. एप्रिल अखेर ४३ हजार ७४३ शेतकऱ्यांना ३८७ कोटी १४ लाखांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने सर्वाधिक कर्ज वितरण केले असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा खरिपासाठी सांगली जिल्हा बॅंकेसाठी ९३ हजार ३६७ शेतकऱ्यांना ११३३ कोटी ५६ लाख इतके लक्षांक आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांना ४७ हजार ५५१ शेतकऱ्यांना ५७८ कोटी ३१ लाख,

खासगी बॅंकेसाठी २४ हजार २९४ शेतकऱ्यांना २९५ कोटी ८२ लाख आणि ग्रामीण बॅंकांना ४५३ शेतकऱ्यांना ५ कोटी ६१ लाख असे एकूण १ लाख ६५ हजार ६६५ शेतकऱ्यांना २०१३ कोटी ३० लाख कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

Crop Loan
Crop Loan Default : पीककर्ज थकित; शासकीय अनुदानही मिळेना

जिल्ह्यातील एप्रिल अखेर जिल्हा बॅंकेने ४२ हजार ४६ शेतकऱ्यांना ३६३ कोटी ३७ लाखाचे कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी बॅंकांनी १२७६ शेतकऱ्यांना १७ कोटी ३५ लाख, खासगी बॅंकांनी ३०१ शेतकऱ्यांना ५ कोटी २४ लाख तर ग्रामीण बॅंकांनी १२० शेतकऱ्यांना १ कोटी ९८ लाख इतके कर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने सर्वाधिक पीक कर्ज वितरित केले आहे.

Crop Loan
Crop Loan: तेहतीस हजारांवर शेतकऱ्यांना ३४२ कोटींचे पीककर्ज वाटप

रब्बीत ९३ टक्के कर्जवाटप

सन २०२४-२५ च्या रब्बी हंगामात १ लाख १७ हजार ९९४ शेतकऱ्यांना १२६० कोटी ५५ लाखाचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८३ हजार ८१३ शेतकऱ्यांना ११८२ कोटी २३ लाख म्हणजे ९३ टक्के कर्ज वितरण करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा बॅंक कर्ज वितरणात आघाडीवर होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com