Harvesting Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Harvesting : पीक काढणीला हार्वेस्टर यंत्राद्वारे प्राधान्य

Agriculture Update : लोहारा तालुक्यातील जेवळी आणि परिसरातील शिवारात पहिल्या टप्प्यातील उडीद, मूग काढणीला सुरवात झाली आहे.

Team Agrowon

Jevli News : लोहारा तालुक्यातील जेवळी आणि परिसरातील शिवारात पहिल्या टप्प्यातील उडीद, मूग काढणीला सुरवात झाली आहे. परंतु, सध्या शेतकऱ्यांना मजूर टंचाईला तोंड द्यावे लागत असून मजुरीत भरमसाठ वाढ केली तरी शेतमजूर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणीला प्राधान्य दिले आहे.

गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. यावर्षी जूनच्या सुरवातीलाच पेरणीयोग्य पाऊस झाल्याने अनेक वर्षांनंतर पेरणी वेळेवर पार पडली. योग्य पाऊस व अनुकूल वातावरणामुळे पिकांची वाढ चांगली झाली असून सध्या शिवारात सोयाबीन, उडीद, तूर, मूग आदी खरीप पिके जोमदार आहेत.

दरम्यान, गेली पंधरवड्यात पावसाने दडी मारली होती. यातच उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. आता पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी शेती क्षेत्रातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सध्या शिवारात पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे उडीद, मुगाच्या राशीला सुरवात झाली आहे. परंतु, सध्या शेती क्षेत्रात मजूर टंचाई निर्माण झाली आहे. पिकांची लागवड, मशागत, राशी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. परंतु, मजुरीत भरमसाठ वाढ केली तरी मजूर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. शेतात कोणी काम करायला तयार नाही, असे चित्र ग्रामीण भागात आहे.

शासकीय योजनेचा फायदा मजूर वर्गांला मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतमजुराची शेतात काम करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. यावर मात करण्यासाठी तसेच शेती व शेतकरी जिवंत ठेवण्यासाठी शासनाने शंभर टक्के अनुदानावर लहान-मोठी कृषी अवजारे उपलब्ध करून देण्याची आता गरज आहे.
मल्लिनाथ वेलदोडे, शेतकरी, जेवळी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाच्या दरात चढ-उतार, ज्वारीच्या दरात वाढ, शेवग्याच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर डाळिंबाचे दर टिकून

Water Storage: गिरणा धरण १०० टक्के भरले; रब्बी हंगामातील पिकांना दिलासा

Farmers Foreign Study Tour: राज्यातील १८० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी, ४ कोटी निधी मंजूर

Onion Planting Preparations: खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिकांच्या कामांना वेग

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT