Sugarcane Harvester Subsidy : ऊस तोडणी यंत्र अनुदानवाटप अखेर सुरू

Subsidy Update : बहुचर्चित ऊस कापणी यंत्र मदत योजनेतील अनुदान वाटपाला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पाच अर्जदारांना दीड कोटीहून अधिक अनुदान मिळाल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
Sugarcane Cutting Machine
Sugarcane Cutting MachineAgrowon
Published on
Updated on

Pune News : बहुचर्चित ऊस कापणी यंत्र मदत योजनेतील अनुदानवाटपाला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पाच अर्जदारांना दीड कोटीहून अधिक अनुदान मिळाल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

शेतकरी कुटुंबातील बेरोजगार तरुणांचा ओढा ऊस कापणी यंत्र खरेदीकडे, अर्थात हार्वेस्टर व्यवसायाकडे आहे. काही भागांत शेतकरी गट आणि साखर कारखान्यांमध्ये तोडीचे ठेके घेणारे मोठे मुकादमदेखील हार्वेस्टर घेऊन यांत्रिक ऊस तोड व्यवसायात उतरले आहेत. राज्याच्या साखर कारखानदारीत आता ऊस तोड मजुरांची सतत टंचाई भासत आहे. त्यामुळे अनेक कारखाने यांत्रिक ऊसतोडीला प्राधान्य देत आहेत. येत्या दहा वर्षांत बहुतेक ऊसतोडी पूर्णतः यंत्रशक्तीवर होतील, असा कयास साखर उद्योगाचा आहे.

Sugarcane Cutting Machine
Sugarcane Harvester Subsidy : ऊस तोडणी यंत्राची सोडत अखेर काढली

हार्वेस्टरची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे इच्छा असूनही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हार्वेस्टर खरेदी करता येत नाही. परिणामी, राज्य शासनाने हार्वेस्टर किमतीच्या ४० टक्के किंवा कमाल ३५ लाखांपर्यंत अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या योजनेची केवळ चर्चा होती. प्रत्यक्षात एकाही हार्वेस्टरचालकाच्या पदरात अनुदान पडले नव्हते.

Sugarcane Cutting Machine
Micro Irrigation Subsidy : सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी ‘महाडीबीटी’त सुधारणा करा

आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की अनुदानवाटप प्रत्यक्ष चालू झाले आहे. पाच जणांना पहिल्या टप्प्यात अनुदान देण्यात आले आहे. अनुदानासाठी ९१३६ अर्ज आले होते. परंतु उपलब्ध निधी बघता यातील केवळ ३७२ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली. अर्थात, पूर्वसंमती देऊनसुद्धा अनुदान वाटपाला वेग आला नाही. कारण बॅंकांकडून हार्वेस्टर कर्जमंजुरीचे प्रस्ताव लवकर मंजूर केले जात नव्हते. अखेर साखर आयुक्तांना या समस्येत हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे योजनेचे प्रस्ताव बॅंकांमध्ये विचारात घेतले जात आहेत.

पहिल्या टप्प्यात हिराबाई सुळ (माळेवाडी, ता. फलटण, जि. सातारा), इवले ओव्हरसिज (वरखेड, ता. नेवासा, जि. नगर), प्रमोद गोंडाळ (चास, ता.जि. नगर), सचिन शिरसाठ (ब्राह्मणी, ता. राहुरी, जि. नगर) व तलमिस शेख (शेवगाव, ता. शेवगाव, जि. नगर) अशा पाच अर्जदारांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी ३४ लाखांच्या आसपास अनुदान रक्कम जमा करण्यात आली आहे.

लवकरच निघणार चौथी सोडत

ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी चौथी सोडत या महिन्यात काढली जाण्याची शक्यता आहे. अनेक लाभार्थ्यांनी पूर्वसंमतीनंतर यंत्र खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे अनुदानवाटपाला येत्या हंगामात वेग येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com