PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : काँग्रेस लूट आणि फसवणुकीचे संपूर्ण पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल

Inauguration of Metro Line-3 projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ठाणे येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रो लाईन-३ चे देखील उद्घाटन करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.५) ठाणे येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी बहूप्रतिक्षीत मेट्रो लाईन-३ चे देखील उद्घाटन केले. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाना साधत काँग्रेस लूट आणि फसवणुकीचे संपूर्ण पॅकेज असल्याची टीका केली. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, मुंबईतील मेट्रो लाईन-३ चे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काम सुरू करण्यात आले होते. तेंव्हा ६० टक्के काम झाले होते. पण महाआघाडीचे सरकारने अहंकाराने मेट्रोचे काम बंद पाडले. यामुळेच प्रकल्पाचा खर्च १४ हजार कोटींवर गेला. पण आता आमच्या सरकारने ॲक्वा लाईन मेट्रोचे काम पूर्ण केले आहे. आज याचे उद्घाटन होत आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जावा, लवकर सुरू व्हावा याची प्रतिक्षा मुंबईतील जनता करत होती. ती आता संपली आहे. जपान सरकारचे पाठिंब्यामुळे आज लोकांच्या सेवेत मेट्रो दाखल होत आहे. यामुळे जपान सरकारचे आभार मानावे तेवढे कमी असल्याचे मोदी म्हणाले.

एकीकडे महायुतीचे सरकार आहे, जे महाराष्ट्राचा विकास करणे हेच आपले ध्येय मानत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि महाआघाडीचे लोक आहेत, जे संधी मिळेल तेंव्हा विकास कामांना ब्रेक लावतात. काँग्रेस हा भारतातील सर्वात अप्रामाणिक आणि भ्रष्ट पक्ष असून तो कोणतेही यूग असो, राज्य असो त्यांच्यात बदल झालेला नाही. त्यांच्या चरित्रात बदल झालेला नाही. गेल्या आठवडाभर अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. यांच्या एका मुख्यमंत्र्यांचे नाव जमीन घोटाळ्यात समोर आले आहे. त्यांचा एक मंत्री महिलांचा अपमान करतो. तर एक नेता ड्रग्जसह पकडला जातो, अशी टीका मोदींनी केली आहे.

पुढे मोदी म्हणाले, काँग्रेस निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देते, पण सरकार बनले की लोकांचे शोषण करते. शोषणाचे नव नवे मार्ग शोधते. त्यांचा अजेंडा लोकांवर कर लादून घोटाळ्यांसाठी पैसा उभा करण्याचा असल्याचा आरोप मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. तसेच आज प्रत्येक भारतीयाचे एकच उद्दिष्ट हे 'विकसित भारत'आहे. याचसाठी सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक संकल्प, प्रत्येक स्वप्न आहे. तर काँग्रेसने विकासाच्या नावावर तयार केलेली खड्डे ही आपल्यालाच भरायची आहेत, असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसवर निशाना साधताना मोदी म्हणाले, हिमाचलमधील काँग्रेस सरकारने कराचा नवा पर्याय शोधत चक्क शौचालय कर लादला आहे. एकीकडे आम्ही म्हणत आहेत की, शौचालय बांधा आणि दुसरीकडे काँग्रेसवाले शौचालयांवर कर लादत आहे. काँग्रेस हे लूट आणि फसवणुकीचे संपूर्ण पॅकेज आहे.

काँग्रेससाठी फक्त एकच व्होट बँक महत्वाची असून त्यांच्यासाठी इतर मते महत्वाची नाहीत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे एकच ध्येय आहे, समाजात फूट पाडणे आणि सत्ता काबीज करणे. पण आपली एकता हीच देशाची ढाल बनली पाहिजे. काँग्रेस आणि आघाडीच्या मनसुबे यशस्वी होऊ नयेत म्हणून प्रयत्न करायचे आहेत असे आवाहन मोदींनी यावेळी राज्यातील जनतेला केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT