PM Kisan and Namo Yojana : 'पीएम किसान’चा १८ वा आणि ‘नमो’चा पाचवा हप्ता खात्यात जमा

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ‘पीएम किसान’सह ‘नमो’च्या पाचवा हप्त्याचे ऑनलाईन वाटप केले.
PM Kisan and Namo Yojan
PM Kisan and Namo YojanAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.५) वाशीम येथील पोहरादेवी ‘पीएम पीएम किसान सन्मान निधीचा १८वा आणि ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे ऑनलाईन जमा केला. पंतप्रधान मोदीं यांनी या कार्यक्रमात बटन दाबत पीएम किसान सन्मान निधीचा १८व्या हप्त्याचे ९.४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. यासाठी सुमारे २० हजार कोटींचा निधी केंद्राने दिला आहे. तसेच ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रूपये देखील ऑनलाईन वाटप करण्यात आले. अशाप्रकारे ‘पीएम किसान’ आणि ‘नमो’चे एकूण चार हजार रुपयांची रक्कम सणासुदीला शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा झाली आहे.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री संजय राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल काहीच दिवसांत वाजणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष जागावाटपावरून रस्सी खेच करत आहेत. तर सत्ताधारी महायुती सरकारकडून विविध निर्णयांचा सपाटा सुरू आहे. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर विविध विकास कामांच्या लोकार्पण केले जात आहे. वाशीम आणि मुंबईत देखील आज विविध विकास कामांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

PM Kisan and Namo Yojan
PM Kisan Yojana : एकाच शेतकऱ्याला २ वेळा पीएम किसानचा हप्ता, राज्यातील ४१६८ शेतकऱ्यांवर होणार कारवाई

यावेळी मोदी म्हणाले, "नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर मला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता जारी करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राचे डबल इंजिन सरकार येथील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ देत आहे. पोहरा देवीच्या आशीर्वादाने मला आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देखील मदत देण्याची संधी मिळाली. लाडकी बहीण योजना स्त्री शक्तीचा सन्मान वाढवत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा थेट लाभ ९.४ कोटी शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम थेट बँक खात्यावर जमा झाल्याचे मोदी म्हणाले. ‘पीएम किसान’ योजना २०१९ मध्ये सुरू झाली. प्रतिहप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यात सहा हजार रुपये प्रति वर्षी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होतात. पीएम किसान योजनेतंर्गत आतापर्यंत १७ हप्ते जमा करण्यात आले आहेत.

‘पीएम किसान’च्या धरतीवर राज्य सरकारच्या ‘नमो’ योजनेचा देखील पाचवा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला. राज्य शासनाने २०२३-२४ ते २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये ९१.४५ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ दिला आहे. तर आतापर्यंत ६ हजार ९४९ कोटी रुपयां वाटप केले गेले आहे. तर पाचव्या हप्त्या पोटी किमान १८०० कोटी रुपये जमा केले जातील, अशी माहिती कृषी आयुक्तालयाने दिली होती.

यावेळी मोदी म्हणाले, "स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात ब्रिटीश सरकारने या संपूर्ण समाजाला गुन्हेगार म्हणून घोषित केले होते, मात्र स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काळजी घेणे आणि त्यांना योग्य तो सन्मान देणे ही देशाची जबाबदारी आहे. काँग्रेसने त्या वेळी समाजाला मुख्य प्रवाहापासून वेगळे ठेवले. काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनच तशी मानसिकता होती. कारण ही मानसिकता त्यांना इंग्रजांनी दिली, असा घणाघात देखील मोदींना या वेळी केला.

PM Kisan and Namo Yojan
Namo Shetkari Yojana: नमोचा हप्ता जमा झाला आहे की नाही तपासण्याची सोपी पद्धत

पुढे मोदी म्हणाले, "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दशकांपासून मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सरकारने शेतकऱ्यांना गरीब आणि दयनीय बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. महाआघाडीचे सरकार जोपर्यंत सत्तेवर होते, तोपर्यंत त्यांनी फक्त दोनच अजेंडेच चालवले. शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प बंद करणे आणि भ्रष्टाचार करणे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देणे हा काँग्रेसचा अजेंडाच असल्याची टीका देखील मोदी यांनी यावेळी केली.

प्रत्येक निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन देणे हा काँग्रेसचा हातखंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने सिंचनाशी संबंधित अनेक कामे रोखून धरली. पण आमचे सरकार आले आणि या कामांना वेग आला ती सुरू केली, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. दरम्यान बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com