PM Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Modi : डॉ. मनमोहन सिंग यांचे कार्य न विसरता येणारे : पंतप्रधान मोदी

Former Prime Minister Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह राज्यसभेतून अनेक खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी, मनमोहन सिंग यांचे देशासाठीचे योगदान मोठे असल्याचे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशातील मोदी सरकारचा कार्यकाळ हा काही महिन्यातच संपणार आहे. तर काही महिन्यात लोकसभा निवडणूका होणार आहेत. त्याचाआधी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आजचा ७ वा दिवस असून आज राज्यसभेतील तब्बल ५६ खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी संसदेत भाषण केले. मोदी यांनी त्यांच्या भाषणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक करताना त्यांचे देशासाठीचे योगदान मोठे असल्याचे म्हटले आहे.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ७ व्या दिवशी राज्यसभेत अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून सरकारकडून अर्थव्यवस्थेबाबत श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभेत लोकसभेत तीन विधेयके मंजूरीसाठी यादीत टाकण्यात आली आहे.

डॉ. मनमोहन सिंग

यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी संसदेत भाषण करताना, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची आठवण करायला आवडेल असे मोदी म्हटले आहे. तसेच सिंग यांनी, त्यांच्या ६ वेळाच्या कार्यकाळात देशासाठी मोठे योगदान दिले आहे. सभागृहात वैचारिक मतभेद, कधीकधी वादविवादात, भांडणे होत असतात. मात्र मनमोहन सिंग यांनी देशाला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. तसेच जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाही मूल्यांवर चर्चा होईल तेव्हा आदरणीय डॉ. मनमोहन सिंग यांची नक्कीच चर्चा होईल असेही मोदी म्हणाले.

तसेच दर २ वर्षांनी या सभागृहात अशा प्रकारे अनेकांना निरोप देण्यात येतो. पण हे सदन अशा सातत्याचे प्रतीक आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तर लोकसभा सभागृहात दर पाच वर्षांनी नवे चेहरे मिळतात. मात्र राज्यसभा सभागृह हे असे आहे की येथे दर २ वर्षांनी नवीन चेहरे येतात. येथे नवीन ऊर्जा येते. यामुळे वातावरणात नवीन उत्साह दिसतो. यामुळे दर दोन वर्षांनी होणारा निरोप समारंभ नसतो असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसकडून सरकारविरोधात 'ब्लॅक पेपर'

दरम्यान केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या श्वेतपत्रिकेवर काँग्रेसकडून विरोध केला जाणार आहे. यावर काँग्रेसकडून सरकारविरोधात 'ब्लॅक पेपर' काढण्यात आला आहे. तसेच बेरोजगारी आणि माहागाईवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठीच हा 'ब्लॅक पेपर' काढण्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच ते म्हणाले, "आज आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात 'ब्लॅक पेपर' काढत आहोत. याचे कारण ते नेहमी सभागृहात त्यांच्या यशाबद्दल बोलतात आणि अपयश लपवतात. जेव्हा आम्ही त्यांचे अपयश दाखवतो तेव्हा आम्हाला महत्त्व दिले जात नाही. हा आमचा मुख्य मुद्दा आहे. 'ब्लॅक पेपर'मध्ये बेरोजगारी हा देशाचा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्यावर भाजप कधीच बोलत नाही असेही खरगे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Management : कपाशीतील कायिक वाढ व्यवस्थापन

Cotton Disease Management : कपाशीतील आकस्मिक मर व्यवस्थापन

Online Money Games Bill : केंद्र सरकारकडून ऑनलाईन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर

Animal Care : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीत पशुधनाची काळजी

Bail Pola Festival : जपा बैलांचे आरोग्य...

SCROLL FOR NEXT