Narendra Modi
Narendra ModiAgrowon

Narendra Modi : विरोधकांच्या टिपणीवर भडकले पंतप्रधान मोदी; कॉँग्रेसवर टीका

माझ्या तिसऱ्या कार्यकाळात २०३० पर्यंत देश तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण होईल, हीच मोदीची हमी आहे, अशी मोदी यांनी संसदेत ग्वाही दिली.
Published on

Budget 2024: अर्थसंकल्पात अल्पसंख्यांसाठी काहीच नाही, अशी टिपणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान केल्यामुळे मोदी चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाबद्दल नरेंद्र मोदी संसदेत सोमवारी (ता.५) बोलत होते. युवा, महिला, गरीब आणि शेतकऱ्यांना समोर ठेवून सरकार काम करत आहे, असं म्हणताच विरोधकांनी टिपणी केली.

विरोधकांना उत्तर देताना मोदी म्हणाले, "कदाचित तुमच्यात मत्स्यपालक, शेतकरी, महिला आणि पशूपालक अल्पसंख्यांक नसतील. तुम्हाला काय झालंय? देशातील युवकांसाठी काम करत असताना त्यामध्ये अल्पसंख्यांक समाजातील युवकांचा विचार केलेला नसतो का? समाजाच्या सर्व घटकांचा त्यामध्ये समावेश होतो." असं म्हणत मोदींनी विरोधकांवर कडवी टीका केली. पुढे मोदी म्हणाले, "कुठवर तुकड्यांमध्येच विचार करणार? समाजात किती दिवस भेद निर्माण करत राहणार? देशाचे तुकडे करण्याचं थांबवा." असं मोदी म्हणाले.

Narendra Modi
Union Budget 2024 : अर्थसंकल्प हे अंतिमत: एक राजकीय विधान

पाचवी अर्थव्यवस्था

देशातील शेतकरी, पशुपालकांना सशक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. देश विकसित राष्ट्र संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं राष्ट्रपतींनी अभिभाषणात सांगितलं आहे. २०१४ मध्ये फेब्रुवारीमध्ये अंतिरम अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं की, भारताची अर्थव्यवस्था ११ स्थानावर होती. पुढील तीन दशकात भारताची अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीनच्या पाठोपाठ पोहचेल. म्हणजेच तिसऱ्या स्थानावर पोहचेल. पण २०२४ मध्ये देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे, असंही मोदी म्हणाले.

तिसऱ्या टर्मची ग्वाही

माझ्या तिसऱ्या कार्यकाळात २०३० पर्यंत देश तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण होईल, हीच मोदीची हमी आहे, अशी मोदी यांनी संसदेत ग्वाही दिली. मोदींनी कॉँग्रेसवर टीका करत कॉँग्रेसला 'कॅन्सल'चा आजार झाला आहे. आत्मनिर्भर भारत, मेक इंडियाला कॅन्सल करण्याचा पायंडा पाडला आहे, असं म्हणत इंडिया आघाडी मोडल्याचं सांगत टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com