Farmer Producer Company Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : ‘आत्मा’कडून शेतकरी कंपन्यांच्या ‘स्मार्ट’ची प्राथमिक मान्यता रखडली

Agriculture Company : कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून लाभ मिळावा यासाठी अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिली जाणारी प्रकल्प उभारणीची प्राथमिक मान्यता रखडली आहे.

Team Agrowon

Nagar : कृषी विभागाच्या ‘आत्मा’कडून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून लाभ मिळावा यासाठी अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिली जाणारी प्रकल्प उभारणीची प्राथमिक मान्यता रखडली आहे.

राजकीय हस्तक्षेपातून आत्माने अनेक शेतकरी कंपन्यांना वेठीस धरले असून हे प्रकार कृषी विभागाने थांबवून रखडलेल्या मान्यता तातडीने द्याव्यात, अशी मागणी ‘स्मार्ट’च्या राज्य प्रकल्प संचालकांकडे केली आहे.

कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. शेतकरी यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देणे महत्त्वाचे आहे व यासाठी त्यांना लागणारे आवश्यक तांत्रिक साह्य, पायाभूत सुविधा यासाठी अर्थसाहाय्य या प्रकल्पांतर्गत दिले जाणार आहे. प्रकल्पामध्ये मूल्यसाखळी विकास यावर भर देण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष पूर्ण करून प्रकल्प अहवाल प्राथमिक मान्यतेसाठी पुणे येथील वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार काही कंपन्यांना प्रकल्प राबविण्यास पूर्वपरवानगी, प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे व काही कंपन्या प्रतीक्षा यादीवर आहेत.

राज्यात केवळ नगर जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून लाभार्थी निवडीचे निकष पूर्ण करून प्राथमिक मान्यतेसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या कंपन्यांना प्रकल्प अहवालानुसार पूर्वपरवानगी, प्राथमिक मान्यता देण्यात आल्या नाहीत.

‘राजकीय दबावाला बळी न पडता परवानगी द्या’

कोणत्याही राजकीय पक्षाच्या व नेत्याच्या दबावाला बळी न पडता प्रतीक्षा यादीतील सर्व कंपन्यांना प्रकल्प राबविण्यासाठी पूर्वपरवानगी, प्राथमिक मान्यता तत्काळ देण्यात यावी व नियमानुसार विहित वेळेत प्रकल्प अहवाल सादर करून गुणांनुसार पात्र झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात यावेत.

या गंभीर विषयाची तत्काळ दखल देण्यात येऊन आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अर्जदारास कळविण्यात यावा. प्रतीक्षा यादीनुसार प्राथमिक मान्यतेसाठी कार्यालयाकडे प्रलंबित असणाऱ्या एकूण कंपन्यांची माहिती देण्यात यावी आणि रखडलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प राबविण्यासाठी पूर्वपरवानगी, प्राथमिक मान्यता तातडीने द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Mahabaleshwar Project : शेत जमिनीचा निवास व पर्यटनासाठी वापर: नवीन महाबळेश्वर आराखड्यात बदल

KVK Washim: हिवरा गणपती येथे केव्हीकेतर्फे मार्गदर्शन

Smart Farming: संकल्पना शेडनेट हाउसची...

NREGA Works: मंजुरी ते बिलापर्यंतचे आर्थिक व्यवहार थांबवा

Grape Farming: वातावरणातील बदलानुसार द्राक्ष बागेतील व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT