Farmer Company : ‘वनश्री’ शेतकरी कंपनीची प्रक्रिया उद्योगात भरारी

Vanashree Farmers Producer Company : नांदरखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील वनश्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आपल्या भागातील मुख्य पीक पद्धती, प्रक्रिया व त्याद्वारे बाजारपेठांची संधी ओळखली. त्यानुसार कापूस जिनिंग- प्रेसिंग, धान्य प्रतवारी- स्वच्छता, नर्सरी, शीतगृह, गोदाम, माती परीक्षण प्रयोगशाळा आदीं विविध उपक्रम सुरू केले आहेत.
Farmer Company
Farmer CompanyAgrowon

Process Industries Update : नंदूरबार हा कापूस, मिरची, केळी व पपई आदी पिकांसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. येथील पीकपद्धती, त्याआधारे बाजारपेठेतील उद्योगसंधी, त्यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचाविण्यासाठी वाव होता. याच हेतूने नांदरखेडा (ता. शहादा) येथील वनश्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचा २०१६ मध्ये जन्म झाला.

कंपनीचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुणे महाविद्यालयातून कृषी, अमेरिकेतील आयोवा विद्यापीठातून फलोत्पादनातील एमएस, तेथेच व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेतली. तेथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत १४ वर्षे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून अनुभव घेतला.

त्यानंतर नोकरीचा राजीनामा देत ते २०१४ मध्ये नंदुरबारात परतले. त्यांचे वडील मोतीलाल पाटील त्या काळातील कृषी पदव्युत्तर पदवीधारक आहेत. त्यांनीही नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत कार्यासाठी प्रेरणा दिली. यातून कंपनीची उभारणी शक्य झाली.

मोतीलाल यांना राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यावरूनच कंपनीचे नामकरण वनश्री असे करण्यात आले. संचालक म्हणून दगडू पाटील, रमेश चौधरी, शिवाजी पाटील, यशवंत पाटील, दिनेश पाटील, योगेश पटेल, संगीता पाटील ही मंडळी कामकाज पाहतात.

Farmer Company
Farmer Protest : सेलू-देवगाव फाटा महामार्गावर शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

कंपनीविषयी दृष्टिक्षेपात

-आजघडीला कंपनीचे १३८७ सभासद. नंदूरबार व धुळे जिल्ह्यात कार्यक्षेत्र. गुजरात व मध्य प्रदेश ही राज्ये नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने निझर (जि. तापी) व बडवानी जिल्ह्यापर्यंत कंपनीचे सभासद. आपल्या भागातील १२ पिके निश्‍चित करून त्यावर कंपनीचे काम.

-मातीच्या आरोग्याला प्राधान्य देत कृषी सेवा सल्ला केंद्र व माती पाणी परीक्षण प्रयोगशाळेपासून कंपनीची सुरवात. गावोगावी जात शेतकऱ्यांसोबत संपर्क वाढविला. प्रयोगशाळेत ५० लाख रुपये गुंतवणूक. आतापर्यंत एक लाखांवर नमुन्यांची तपासणी व मार्गदर्शन.

-कापूस, केळी, पपई पिकात शेतकरी मेळावे. हवामान सल्ला व व्यवस्थापन मार्गदर्शन. रासायनिक खते व कीडनाशकांचा अनावश्यक वापर टाळण्यासंबंधी कंपनीच्या प्रयत्नांना यश.

-रास्त दरात निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी केंद्र.

-नंदूरबार जिल्ह्यात उसाची १३ ते १४ हजार हेक्टरवर लागवड होते. ही बाब लक्षात घेता ऊस पिकाच्या जातिवंत रोपनिर्मितीसह ऊस उत्पादकता वाढ कार्यक्रम.

-शासनाच्या स्मार्ट योजनेतून कपाशी गाठींसाठी एक हजार टन क्षमतेचे गोदाम (नांदरखेडा).

-प्रकिया उद्योगांसाठी शीतगृह उभारणे सुरू. त्याची क्षमता दोन हजार टनांची. २४ टन क्षमतेचे केळी पिकवणी केंद्र व दररोज चार टन मिरचीवर प्रकिया होईल एवढ्या क्षमतेचे केंद्र उभे राहात आहे.

-यात आशियायी डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने व मॅग्नेट प्रकल्पातून चार कोटी रुपये तर एकूण आठ कोटी ९५ लाख रुपये प्रकल्पासाठी

मिळणार. पपई, मिरचीची शेतकऱ्यांकडून थेट खरेदी व प्रक्रिया करून अधिकाधिक मूल्यवर्धन करण्याचे नियोजन.

-ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिकेही घेतली.

Farmer Company
Wakeshwar Farmers Producers Company : शेती, पूरक, प्रक्रियेवर भर देणारी वाकदची ‘वाकेश्‍वर’

कापूस जिनिंग प्रेसिंग

कंपनीने जिनिंग प्रेसिंग कारखाना दोन वर्षांपूर्वी सुरू केला आहे. कापसाची खानदेशातील शेतकऱ्यांकडून थेट तसेच खेडा खरेदी होते. प्रक्रिया क्षमता प्रतिदिन ३०० गाठी (एक गाठ १६२ किलो) आहे. यंदा १० हजार गाठींची निर्मिती झाली, त्याचा लाभ कापूस उत्पादकांना मिळाला. सन २०२२-२३ च्या हंगामात ८१०० ते कमाल ८५०० रुपये प्रति दर शेतकऱ्यांना कंपनीकडून मिळाला.

धान्य स्वच्छता, प्रतवारी

कंपनीचे धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्रही आहे. मका, सोयाबीन, गहू व हरभरा यावर येथे प्रक्रिया होते. एक रुपये प्रति किलो असे शुल्क असून, शेतकऱ्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद आहे. मागील रब्बीत २० हजार क्विंटल गहू व १५ हजार क्विंटल हरभऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढे आपल्या धान्यास अधिक दर मिळवणे शक्य झाले.

रोपांची निर्मिती

कंपनीची दोन एकरांत ‘नर्सरी’ आहे. त्यात पपई, मिरची, कलिंगड, झेंडू, वांगी, टोमॅटो, कोबी आदींची दर्जेदार रोपे तयार केली जातात. रास्त दरात त्यांचा शेतकऱ्यांना पुरवठा होतो. राज्यातील महत्त्वाचा पपई व मिरचीचा पट्टा म्हणून नंदुरबार जिल्हा प्रसिद्ध आहे. हे लक्षात घेऊन दोन्ही पिकांच्या गुणवत्ताप्रधान रोपांची पुरेशी उपलब्धता करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

कंपनीची आश्‍वासक उलाढाल

सुरुवातीला कंपनीचे ४८ लाख ६० हजार रुपये भागभांडवल होते. तर उलाढाल सुरुवातीला तीन कोटी रुपये होती. सन २०२१-२२ मध्ये १९ कोटी रुपये तर २०२२-२३ मध्ये ३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या ज्ञानवर्धनासह पायाभूत सुविधांवर खर्च करण्यासंबंधी अजेंडा राबविला जातो.

संपर्क - योगेश नांद्रे - (मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘वनश्री’ कंपनी) - ९८५०७९७३००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com