Farmer Producer Company : शेतकरी उत्पादक कंपनी पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण योजना

Training Scheme : सक्षम व शाश्वत कंपनी चालविण्यासाठी प्रशिक्षणाची सुविधा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांनी उपलब्ध केली आहे.
Farmer producer Company
Farmer producer CompanyAgrowon
Published on
Updated on

डी.एम.साबळे

Agriculture processing industry : शेतीमालास योग्य दर मिळावा, शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढावे व शेतमालाची एकत्रित व प्रक्रियायुक्त शेतमालाची ब्रॅण्ड नेम विकसित होऊन शेती फायदेशीर व्हावी, यासाठी सद्यःस्थितीत राज्यात नाबार्ड, एस.एफ.एसी किंवा स्वतः काही शेतकऱ्यांनी मिळून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे.

शासनाचा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा मुख्य उद्देश लहान व मध्यम शेतकऱ्यांचा आर्थिक उन्नतीसाठी काम करणे हा होता. परंतु अनेक शेतकरी उत्पादक कंपनी या शासकीय अनुदान प्राप्त करणे किंवा शासकीय हमी भाव खरेदी केंद्र स्थापन करणे व त्याची हमी भावाने खरेदी करणे या एकाच कामात व्यस्त असल्याचे निदर्शनास येते की, या संस्था स्थापनेमागील हा उद्देश कधीही नव्हता.

सक्षम व शाश्वत कंपनी चालविण्यासाठी प्रशिक्षणाची सुविधा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांनी उपलब्ध केली आहे.

सारथी ही संस्था महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे.

शेतकरी कंपनीच्या लक्षित गटातील संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधिक सभासद यांच्यासाठी विनाशुल्क क्षमता बांधणी पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम योजना सुरू झाली आहे. या संस्थेमार्फत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्याशी सहकार्य करार केला आहे.

Farmer producer Company
Farmer Producer Company Scheme : केंद्र, राज्य शासनाच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी योजना

योजनेचे उद्देश व समाविष्ट विषय

१) शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांचे आदर्श व्यवस्थापन.

२) शेतकरी उत्पादक कंपन्यांना वित्त पुरवठा, वैज्ञानिक प्रतिपूर्ती, कंपनीचे वित्तीय नियोजन व व्यवस्थापन विकास आराखडा निर्मिती.

३) शेतीमाल निर्यातीमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना वाव, संधी व कार्यप्रणाली.

४) शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सभासदांना शाश्वत निविष्ठा पुरवठा.बाजाराची गतिशीलता समजावून घेणे.

५) शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाइन विक्री व्यवस्था.

६) शेतीमालाचे विपणन, साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, मुल्यसाखळी निर्मिती.

७) शेतकरी उत्पादक कंपनी सभासद विसंवाद, प्रशासन व लेखाकर्म.

८) व्यावसायिक जोखीम व वित्तीय व्यवस्थापन.

९) केंद्र व राज्य पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपनीसाठी विविध योजना

निवडीचे निकष

१) शेतकरी उत्पादक कंपनी सभासद हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

२) प्रशिक्षणासाठी पात्र व्यक्ती ही मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील असावी. शेतकरी उत्पादक कंपनीची सभासद असावी.

३) प्रशिक्षणासाठी पात्र लक्षित गटातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय (EWS) /नॉन क्रीमिलीयर गटातील असावी. सदर सभासद शेतकऱ्यांचे मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये आठ लाखांपेक्षा जास्त नसावे, याबाबत संबंधित तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असावा.

४) उत्पादक कंपनीची कंपनी कायदा २०१३ नुसार Register of Company (ROC) कडे नोंदणी झालेली असावी.

५) कंपनीच्या भागधारकांची संख्या ५० पेक्षा कमी नसावी.

६) शेतकरी हा नाबार्ड/एन. ए. सी. पी. योजनेद्वारे प्रशिक्षणासाठी अनुदान प्राप्त शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद नसावा.

७) एका कंपनीतील जास्तीत-जास्त पाच व्यक्ती लक्षित गटातील प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात.

Farmer producer Company
शेतकरी उत्पादक कंपनीसाठी सनदी लेखापाल, कंपनी सचिवांच्या सेवा

आवश्यक कागदपत्रे

१) शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी प्रमाणपत्र

२) प्रशिक्षणार्थी आधारकार्ड

३) प्रशिक्षणार्थी लक्षित गटातील असल्याबाबत जातीचा दाखला.

४) प्रशिक्षणार्थी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EWS) /नॉन क्रीमिलीयर गटातील असल्याबाबत सक्षम ५) अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला.

अर्ज प्रक्रिया

१) प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज www.sarthi-maharashtragov.com व www.mahamcdc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक आहे.

प्रशिक्षणार्थी निवड

१) शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे प्राप्त अर्जांपैकी मुल्यांकनाद्वारे अधिक गुणांक प्राप्त करणाऱ्या राज्यातील फक्त प्रथम १९२ शेतकरी उत्पादक कंपनीच्या लक्षित गटातील संचालक/सभासद/ मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाचे ठिकाण : पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, दापोली

नियोजन

१) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीला पुढील दोन वर्षे निःशुल्क मार्गदर्शन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

त्यामध्ये संबंधितांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा, मार्केट लिंकेजेस, इक्व‍िटी ग्रॅन्ट प्रपोझल, शेतकरी उत्पादक कंपनी निगडित योजना, बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडित शासकीय अधिकारी इतर स्टेक होल्डर यांच्यामध्ये समन्वय साधने इत्यादी सेवा पुरविण्यात येणार आहे.

२) आवश्यकता असल्यास या संस्थांना कालानुरूप विविध नावीन्यपूर्ण विषयाचे पुन्हा पुढील आर्थिक वर्षात शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीच्या आधारे प्रशिक्षणाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संपर्क- हेमंत जगताप, ८२७५३७१०८२, (लेखक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे विभाग प्रमुख (प्रशिक्षण) म्हणून कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com