Vitthal Sahkari Sugar Factory Pandharpur : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून आगामी गळीत हंगामासाठी उसाला प्रति टन उच्चांकी ३ हजार ५०० रूपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वात उच्चांकी दर देणारा म्हणून विठ्ठल कारखाना ठरण्याची शक्यता आहे. कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी याबाबत घोषणा केली.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देण्याची यंदाही परंपरा अभिजीत पाटील यांनी कायम ठेवली. दि रविवारी (ता. ८) विठ्ठल साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
अभिजीत पाटील हे माढा विधानसभा मतदार संघातून तयारी करत असल्याने त्यांनी अजित पवार गटाचे बबन शिंदे यांना एकप्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. याबरोबर पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याने सभासदांचे हीत आणि राजकारण या दोन्हीचा संगम साधला आहे.
अभिजीत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू केला. सध्या तो सुस्थितीमध्ये आला आहे. गतवर्षीच्या हंगामामध्ये पाटील यांनी सर्वाधिक तीन हजार रुपयांचा ऊस दर दिला आहे. पाटील यांनी एक रक्कमी ऊस दर देण्याची परंपरा सुरू केल्याने जिल्ह्यातील अन्य साखर कारखानदारांना देखील अधिकचा ऊस दर द्यावा लागत आहे.
ऊस दराची स्पर्धा सुरू झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत ऊस दराचा मुद्दा देखील चर्चेत राहणार आहे. याबाबत पाटील म्हणाले की, गतवर्षी हंगाम यशस्वीपणे पार पाडला. सभासदांना तीन हजार रूपये ऊस दर दिला. यंदा कारखान्याची गाळप क्षमता वाढणार आहे. दररोज किमान १०,००० टन गाळप होईल. आता ३५०० रुपये दर दिला जाईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.