Pune News : देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न यंदा पहिल्यांदाच पाच जणांना जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली होती. या पाच जणांपैकी चौघांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार घोषित झाला. तर भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांना ते हयात असताना भारतरत्न दिला जाणार आहे. हा पुरस्कार रविवारी (ता.३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अडवानी यांच्या घरी जाऊन देणार आहेत. आज शनिवारी (ता. ३०) पार पडलेल्या राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव, माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना दिला जाणारा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांकडे राष्ट्रपती मुर्मू यांनी दिला.
प्रतिवर्षी तीन जनांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी तरतूद आहे. मात्र अनेक वेळा चार जनांना तो देण्यात आला आहे. तर यंदा पहिल्यांदाच पाच जनांच्या नावाची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. याप्रमाणे आज नरसिंह राव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.
भारतरत्न मिळविणाऱ्यांची संख्या
१९५४ मध्ये भारतरत्न फक्त जिवंत व्यक्तीलाच देण्यात आला होता. यात १९५५ मध्ये सुधारणा करण्यात आली आणि मरणोत्तर भारतरत्न देण्यास सुरूवात झाली. तसेच वर्षभरात फक्त तीन व्यक्तींना भारतरत्न दिला जात असे. पण नंतर यात बदल होत गेले. वर्षभरात चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहेत. तर २०१४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांचा मोदींच्या कार्यकाळात भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर आता २०२४ मध्ये ५ जनांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहेत. तर आतापर्यंत हा सन्मान मिळविणाऱ्यांची संख्या ५३ वर पोहोचली आहे.
पीव्ही नरसिंह राव
पीव्ही नरसिंह राव हे देशाचे ९ वे पंतप्रधान होते. त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना, मोदी म्हणाले होते, नरसिंह राव यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ हा महत्त्वाच्या होता. त्यांनी भारताला जागतिक बाजारपेठांसाठी खुले केले. यामुळे आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना मिळाली.
चौधरी चरणसिंग
चौधरी चरणसिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. तर त्यांनी उत्तर प्रदेशचे ५ वे मुख्यमंत्री म्हणून देखील काम पाहिले होते. तर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते.
कर्पूरी ठाकूर
राष्ट्रपती मुर्मू यांनी कर्पूरी ठाकूर यांच्या नावाची घोषणा २३ जानेवारी रोजी भारतरत्न पुरस्कारासाठी केली होती. कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते. मागासवर्गीयांच्या हिताचा पुरस्कार करण्यासाठी त्यांची ख्याती होती.
डॉ. एमएस स्वामीनाथन
डॉ. स्वामीनाथन हे कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतीय शेतीचाच कायापालट केला. तसेच देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धी देखील सुनिश्चित केली. यामुळे त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते.
आडवाणी यांची वेगळी ओळख
आडवाणी यांना अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे यासाठी रथयात्रा काढली होती. तर भाजपध्ये महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले. तसेच अडवानी यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले. २०१५ आडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.