Bharat Ratna Award : कृषिसंशोधक एमएस स्वामीनाथन, चौधरी चरणसिंग यांच्यासह नरसिंह राव यांना 'भारतरत्न' जाहीर

Bharat Ratna : यंदा सर्वोच्च नागरी सन्मान (भारतरत्न) पुरस्कारासाठी देशातील पाच व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
Bharat Ratna Award
Bharat Ratna Awardagrowon
Published on
Updated on

Bharat Ratna Award News : यंदाचा सर्वोच्च नागरी सन्मान (भारतरत्न) पुरस्कारासाठी देशातील पाच व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांच्यानंतर आज पुन्हा तीन नावांची घोषणा करण्यात आली. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांच्यासह देशाच्या शेतीत क्रांती करणाऱ्या एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी एकापाठोपाठ तीन ट्विटमध्ये तीन जणांच्या नावाची घोषणा केली.

चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न

देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले असल्याचे ट्वीट केले आहे.

एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न

'भारत सरकार डॉ. एमएस स्वामीनाथन यांना त्यांच्या कृषी आणि शेतकरी कल्याणातील उल्लेखनीय योगदानासाठी भारतरत्न देऊन सन्मानित करत आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले.

त्यांच्या अमूल्य कार्याची आम्हालाही ओळख आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही, तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीतही त्यांचे योगदान मोठे आहे.

माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव

एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव यांनी देशाची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे लोकसभा व विधानसभा सदस्य या नात्याने त्यांनी केलेल्या कामाचा आजही उल्लेख होतो. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले.

आतापर्यंत ५३ जणांचा सन्मान

सुमारे ६८ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या सर्वोच्च सन्मानाने आतापर्यंत ५३ जणांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राज गोपालाचारी, शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना १९५४ मध्ये पहिल्यांदा भारतरत्न देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com