Aslam Abdul Shanedivan
एकाच वेळी देशातील तीन व्यक्तींना भारतरत्न देऊन सन्मानित केले जाते. मात्र यंदा ५ जणांना हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार घोषीत झाला आहे.
यामुळे हा सन्मान प्राप्त करणाऱ्यांची संख्या ५३ झाली आहे. तर याच्या आधी १९९९ साली चार जणांच्या नावांची घोषणा झाली होती. तर १९५४, १९५५, १९९१, १९९२, १९९७ आणि २०१९ मध्ये तिघा जणांना भारत रत्न देण्यात आला.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांच्यासह यंदा लालकृष्ण आडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर झाला आहे. यांच्या नावाची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.
लालकृष्ण आडवाणी हे भाजपचे सर्वाधिक भाजप पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. तर तीन वेळा खासदार आणि अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान होते. त्यांनी १९९० साली राम मंदिरासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती.
देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते.
नरसिंह राव यांनी देशाची सेवा करताना, त्यांच्या कार्यकाळात भारताला जागतिक बाजारपेठा खुल्या केल्या. यामुळे आर्थिक विकासाचे नवे पर्व सुरू झाले.
डॉ. एमएस स्वामीनाथन यांना देशातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी कृषी आणि शेतकरी कल्याणासाठी भरीव कार्य केले आहे. त्याच्या या कार्यामुळे देशाला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत मिळाली आहे.