IAS Deepa Mudhol  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Harvest Tables : पीक कापणी तक्ते त्वरित सादर करा : जिल्हाधिकारी दिपा मुधोळ

IAS Deepa Mudhol : ज्या पिकांचे पीक कापणी तक्ते प्रलंबित आहेत ते दोन दिवसात सादर करण्याच्या सूचना खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीत करण्यात आल्या

Team Agrowon

Beed News : ज्या पिकांचे पीक कापणी तक्ते प्रलंबित आहेत ते दोन दिवसात सादर करण्याच्या सूचना खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीत करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप २०२४- २५ हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.

आढावा बैठकीला शिरूर कासार तालुका कृषी अधिकारी सूचना देऊनही अनुपस्थित राहिले, त्याचा खुलासा घेऊन कारवाईबाबत निर्णय झाल्याचे बैठकीच्या इतिवृत्तात नमूद आहे. बैठकीत मागील सभेचे अनुपालन अनुषंगाने १ मे २०२३ रोजी पार पडलेल्या खरीप आढावा सभेचे अनुपालन ६ एप्रिलपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सर्व संबंधित विभाग प्रमुखांना पत्र देऊनही आगामी सभेसाठी सादर करावयाची माहिती अजून प्राप्त झाली नाही. त्यामुळे आगामी खरीप सभेसाठी माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी लागणारी माहिती ६ एप्रिलपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला असून संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

तसेच मोबाईल क्रमांक ९४०३३०८६०८ व कक्षाचा क्रमांक ०२४४२- २९९४८८ प्रसारित करण्यात आला. देण्यात आलेला मोबाईल क्रमांक यापुढे हंगामात खते, बियाणे, औषधाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी ठेवण्यात आला आहे. येत्या खरीप बैठकीत मागील खरीप बैठकीतील मुद्द्यांचे अनुपालन सादर केले जाईल.

त्यानंतर विविध विभागाचे सादरीकरण होईल. आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर येत्या १ मे रोजी होणारी खरीप नियोजन बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता आहे. कृषी विकास अधिकारी यांच्याकडील निविष्ठा उपलब्धतेचा आढावा सादर करण्यात आला.

पीकविमाबाबत अग्रिम व समायोजन याबाबत प्रक्रियेची माहिती सभेस देण्यात आली. जिल्हा प्रतिनिधी यांनी खरीप २०२३ चे नुकसान संदर्भात वाटपाची माहिती सादर केली. प्रत्यक्ष खरीप बैठकीत अत्यावश्यक मुद्दे ठेवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Mechanization Scheme: अवजारे अनुदानातील कमाल मर्यादा हटविली

October Heat: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ तापदायक

Mukhyamantri Majhi Shala: ‘मुख्यमंत्री माझी शाळा’चा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून

Cotton Market: कापसाची आवक अल्प हमीभावाच्या फक्त घोषणाच

Farmer Struggle: मजुरांअभावी वेचणीचा कापूस पडून

SCROLL FOR NEXT