Electric Transformer : जुळे सोलापूरला नव्या ३५ विद्युत रोहित्रांची गरज

Electricity Issue : जुळे सोलापुरात वाढत्या वसाहतीमध्ये पुरेशा प्रमाणात ट्रान्स्फॉर्मरची संख्या नसल्याने कमी दाबाच्या विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Agriculture Transformer
Agriculture TransformerAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जुळे सोलापुरात वाढत्या वसाहतीमध्ये पुरेशा प्रमाणात ट्रान्स्फॉर्मरची संख्या नसल्याने कमी दाबाच्या विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भागात पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने मोटारी जळणे, विजेच्या दिव्याचा प्रकाश कमी पडणे असे प्रकार होत आहे. यामुळे या भागात तब्बल ३५ वाढीव रोहित्रांची गरज निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांपासून जुळे सोलापुरातील ओम गर्जना चौक, राघवेंद्र नगर, कोळी नगर सोसायटी, बिलालनगर, आयएमएसमागील भागात वीजपुरवठा अनेकवेळा कमी दाबाने होतो. या बाबत नागरिकांनी तक्रार केली तर कमी दाबाच्या पुरवठ्याला आम्ही काही करू शकत नाही,

Agriculture Transformer
Agriculture Transformer : शेतीपंप, डीपी बिघाडावर ‘कपॅसिटर’चा उतारा

असे वीज कर्मचाऱ्यांचे म्हणणे असते. त्यासाठी रोहित्र वाढवल्यावरच विजेचा पुरवठा योग्य होईल, असे म्हणून तक्रारीवर कोणतीच कारवाई होत नाही. मात्र प्रत्यक्षात कमी दाबामुळे मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

तसेच सामान्य नागरिकांना अनेक वर्षे कमी दाबाच्या विजेचा पुरवठा केला जात आहे. एकीकडे महावितरण भरमसाट वीज दरवाढ करते व उशिरा वीजबिल भरल्यास भरमसाट दंड लावते. मात्र पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्याबाबत संथगतीने कारवाई करते असे चित्र आहे. जुळे सोलापुरातील वस्त्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्याच वेगाने रोहित्र बसवण्याचे काम देखील होणे गरजेचे आहे.

Agriculture Transformer
Electricity Transformer : अकोला परिमंडलात रोहित्र बिघडण्याचे प्रमाण झाले कमी

ठळक बाबी

वाढत्या वसाहतींची विजेची गरज वाढती.

प्रत्येक रोहित्रावर जादा लोड असल्याने अडचण जादा लोडची वीज कर्मचाऱ्यांकडून कबुली.

एकूण ३५ रोहित्रांची तत्काळ गरज.

ओम गर्जना चौकात तीन दिवसांपूर्वी नवा ट्रान्स्फॉर्मर बसवला आहे. त्यामुळे तेथील प्रश्न सुटला आहे. जसे ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध होतील त्यानुसार ते बसवले जातील.
सुधीर ननवरे, सहायक अभियंता, महावितरण, जुळे सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com