Indian Farmer AgrowonAgrowon
ॲग्रो विशेष

Indian Farmer : शेतात अन् बाजारातही हवा शेतकरी

शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होण्यासाठी त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत म्हणून ब्रिटिशांसमोर त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या.

Team Agrowon

शेतकरी हिताची संकल्पना ब्रिटिश पूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी मांडली होती. शेतात शेतकरी आणि भाजी मार्केटमध्येही (Vegetable Market) शेतकरीच दिसायला हवेत, असा विचार त्यांनी शेतकऱ्यांप्रति व्यक्त केला होता.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ब्रिटिशपूर्व काळात १० जानेवारी १९३८ मध्ये २५ हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर घेऊन जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने ब्रिटिश पूर्व काळातील शेतकऱ्यांसाठी लढणारे शेतकऱ्यांचे कैवारी बनले होते.

शेती आणि शेतकऱ्याला पोषक असणारी संकल्पना ही अनेक शेतकरी सभांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली.

शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होण्यासाठी त्याच्या मालाला योग्य भाव (Agriculture Produce) मिळावा, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत म्हणून ब्रिटिशांसमोर त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कायम शेतकऱ्यांच्या हितालाच न्याय मिळवून देणारा होता. एवढेच नव्हे तर राज्यघटनेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी हिताचे कायदे तयार केलेले आहेत.

शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि राज्यघटनेतील शेतीविषयक तरतुदींना समजून घेणे आवश्यक आहे. पाण्याच्या नियोजनावरही शेतकऱ्यांची शेती अवलंबून असते.

म्हणून दुष्काळ सदृश परिस्थिती हटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचे नियोजन करण्याच्या उपाययोजना आखल्या होत्या.

पाण्याचे प्रकल्प उभारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जलतज्ञ म्हणूनही ओळखले जातात. आज पाण्याच्या नियोजनाअभावी शेतकरी हा अनेक समस्यांमध्ये अडकून पडलेला आहे.

शेतकऱ्यांचे शेती करण्याचे नियोजन फसते आहे. दुष्काळाची परिस्थिती दूर करण्याकरिता यंत्रणेने बाबासाहेब यांचे पाणीविषयक आणि शेतीविषयक विचार हे सत्यात उतरविले पाहिजेत.

शेतकऱ्यांनी आपला माल हा मार्केटमध्ये घेऊन गेले पाहिजे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणारा होता. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळवून देणारा होता.

ग्राहकवर्गालाही रोजची रोज ताजी भाजी मिळवून देणारा हा शेतकरीच असतो. आज शेती पिकविणारा शेतकरी दारिद्र्यात आहे आणि कमी भावाने शेतकऱ्यांचा माल घेणारा व्यापारी वर्ग धनवान झाला आहे.

शेतात जो राबतो तोच खरा धनवान व्हायला हवा. परंतु ते चित्र आज उलटे झाले आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे शेतकऱ्यांचेही नेते होते, हे दुर्लक्षित करता येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ते ब्रिटिशांविरोधात लढले.

शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठा संघर्ष त्यांनी उभा केला होता. शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद भूषवीत ते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी खंबीर पणे उभे राहिले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ एप्रिल १९२९ ला रत्नागिरी जिल्ह्यांतील चिपळूणमध्ये शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तयार केला.

हा जाहीरनामा शेतकऱ्यांची दुःखे आणि संकटे मांडणारा ठरला. त्यांनी ब्रिटिशांपुढे ठेवलेल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आपण आपल्या हक्कांचा लढा हा असाच पुढे चालू ठेवला पाहिजे, असे आवाहन जमलेल्या शेतकरी वर्गाला केले होते.

तुमची दुःखे अनेक आहेत. ती दूर करण्यास तुम्हीच तुमची कंबर कसली पाहिजे. त्यासाठी तुमची संघटना जितकी मजबूत कराल तेवढेच तुमचे प्रश्न लवकर आणि सहजरीत्या सोडवले जातील, असे मोलाचे मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९३८ ला केले होते.

शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसविण्याचे काम राज्य घटनेतील तरतुदीमध्ये करण्यात आलेले आहे. तुकड्यांमध्ये वाटून केली गेलेली शेती ही तोट्यांमध्ये जाते. त्यामुळे सामूहिक शेती करण्यास त्यांनी त्या काळात सांगितले.

स्वतंत्र मजूर पक्षाचा १९५१ चा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी त्यांनी या जाहीरनाम्यात शेतीचे यांत्रिकीकरण झाले पाहिजे, परंपरागत शेती करीत असलेल्या पद्धतीत बदल झाला पाहिजे, असे जाहीर केले.

शेती व शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणाचे व लाभाचे कायदेही बनविले गेले. परंतु कायदे हे ठोस अंमलबजावणी न करण्यातच अडकून पडले. कोकणातील शेतकऱ्यांची खोतांच्या जाचातून मुक्तता मिळावी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३७ मध्ये मुंबई विधिमंडळात कायद्याचे विधेयक मांडले

१० जानेवारी १९३८ सालच्या शेतकरी मोर्चाने कोकण दौऱ्याची पाहणी यंत्रणेकडून घडवून आणली. शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजही समस्त शेतकरी वर्गांसाठी प्रेरणास्त्रोतच आहेत.

त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सक्षम शेतीसाठी बाबासाहेब यांची शेती विषयक ध्येय-धोरणे अभ्यासली पाहिजेत.

शिवाय शेतकऱ्यांनी शेतात सदैव राबत असताना त्याने आपला माल बाजारात घेऊन जात असताना चांगला भाव ही उपलब्ध करून घेण्यासाठी लढत राहिले पाहिजे.

सुशील गायकवाड, तरडगांव ता. फलटण, जि. सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT