Flower Farming : शेतकरी नियोजन - पीक ः जरबेरा

पुणे जिल्ह्यातील आर्वी (तानाजीनगर, खेड शिवापूर, ता. हवेली) येथील केशव निवृत्ती सणस पुणे बाजार समितीमध्ये मापाडी म्हणून काम करतात. सकाळी बाजार समितीमध्ये आणि दुपारी पुणे शहरात रिक्षा चालवायचे.
Gerbera Flower Farming
Gerbera Flower Farming Agrowon
Published on
Updated on

शेतकरी ः केशव निवृत्ती सणस

गाव ः आर्वी, खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे

एकूण शेती ः ३ एकर

जरबेरा लागवड ः २० गुंठे

पुणे जिल्ह्यातील आर्वी (तानाजीनगर, खेड शिवापूर, ता. हवेली) येथील केशव निवृत्ती सणस पुणे बाजार समितीमध्ये मापाडी म्हणून काम करतात. सकाळी बाजार समितीमध्ये (Pune APMC) आणि दुपारी पुणे शहरात रिक्षा चालवायचे.

त्यांची आर्वी गावामध्ये दोन ठिकाणी प्रत्येकी दीड एकर अशी एकूण तीन एकर शेती आहे. यात त्यांनी टप्प्याटप्प्याने १०-१० गुंठे क्षेत्रावर दोन पॉलिहाउस उभारले आहेत.

यामध्ये जरबेरा फुलांची लागवड (Gerbera Farming) केली आहे. योग्य व्यवस्थापनातून प्रतिदिन साधारण २ हजार फुलांचे उत्पादन (Flower Production) त्यांना मिळते.

Gerbera Flower Farming
Nishigandha Flower : शेतकरी का देत आहेत निशिगंधाला पसंती ?

लागवड नियोजन ः

- पॉलिहाउस उभारणीसाठी दर्जेदार लाल मातीची आवश्यकता होती. ती उपलब्ध करण्यासाठी भोर परिसरातून १४०० रुपये प्रति ब्रास दराने १३० ब्रास माती खरेदी केली. तसेच सुमारे ३३ ब्रास शेणखतही खरेदी केले. लाल मातीमध्ये शेणखत आणि खतांचे बेसल डोस मिसळून घेतले.

- पॉलिहाउसमध्ये रोपांच्या लागवडीसाठी गादीवाफे तयार केले. त्यावर ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरून घेतल्या.

- लागवडीसाठी खासगी रोपवाटिकेत रोपांची आगाऊ मागणी केली होती. त्यानुसार लागवडीवेळी योग्य वाढ झालेली आणि निरोगी रोपांची खरेदी केली.

- सुरुवातीला ४०० रोपांची लागवड केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रोपे आणत लागवड केली.

- सध्या दोन्ही पॉलिहाउसमध्ये मिळून साधारण १ हजार रोपांची लागवड केली आहे.

Gerbera Flower Farming
Flower Crop : फ्लावरचे अंतर पीक जोमात

पॉलिहाउसचा विस्तार ः

सुरुवातीच्या १० गुंठे क्षेत्रावरील पहिल्या पॉलिहाउसमधून मिळणाऱ्या उत्पादनातून आत्मविश्‍वास वाढला.

त्यामुळे पॉलिहाउसमध्ये वाढ करण्याचे ठरविले. २०१७-१८ मध्ये पुन्हा १० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउस उभारणी केली.

एकदा लागवड केल्यानंतर सरासरी ५ वर्षांपर्यंत फुलांचे उत्पादन मिळत असल्याचे फूल उत्पादक सांगतात.

मात्र योग्य व्यवस्थापनातून ७ वर्षांपर्यंत चांगले उत्पादन मिळत असल्याचे केशवराव सांगतात. सध्या दररोज प्रतिदिन २ हजार फुलांचे उत्पादन मिळते आहे.

Gerbera Flower Farming
Flower Exhibition :`एम्प्रेस गार्डन`मध्ये बुधवारपासून पुष्पप्रदर्शन

व्यवस्थापनातील बाबी ः

- आठवड्यातील प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी ०ः५२ः३४, १२ः६१ः०, ०ः०ः५२ या विद्राव्य खतांच्या मात्रा ठिबकद्वारे दिल्या जातात.

- दर बुधवारी फुलांचा दांडा कडक होण्यासाठी ठिबकद्वारे कॅल्शिअम नायट्रेटची मात्रा दिली जाते.

- कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारणी घेतली जाते.

- झाडांच्या पोषणासाठी दिवसाआड वाढ संजीवकांचा वापर केला जातो.

- पॉलिहाउसमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फॉगर्स, शॉवरद्वारे पाण्याची फवारणी केली जाते.

- उन्हाळ्यात दर ६ दिवसांनी, तर हिवाळ्यात ४ दिवसांनी पाण्याचा शॉवर दिला जातो. यामुळे पॉलिहाउसमधील तापमान नियंत्रित ठेवले जाते.

उत्पादन व विक्री नियोजन ः

- जरबेरा फुलांचे उत्पादन वर्षभर सुरू राहते. एका पॉलिहाउसमधून दररोज १ हजार ते १३०० पर्यंत फुलांचे उत्पादन मिळते.

- काढणी सकाळी लवकर केली जाते. काढणी पूर्ण झाल्यानंतर पांढरा, पिवळा, लाल, पिवळा अशा विविध रंगांच्या फुलांच्या जुड्या बांधल्या जातात.

- फुलांच्या जुड्यांचे योग्य पॅकिंग करून पुणे बाजार समितीत विक्रीसाठी पाठविली जातात.

- फुलांच्या दरात सतत कमी जास्त होत राहतात. सण-समारंभाच्या

काळात मागणी वाढल्याने चांगले दर मिळतात. साधारणपणे प्रति

फूल एक रुपयापासून ते ३ रुपये दर मिळतो. सण-समारंभ, लग्नसराईच्या काळात १० रुपयांपर्यंत दर मिळतो. दोन्ही पॉलिहाउसमधून वर्षाला साधारणपणे १० लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

उत्पादन खर्चात बचत ः

पॉलिहाउसमध्ये काम करण्यासाठी एकही मजूर लावलेला नाही. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठे बचत होते. पत्नी माधवी, मुलगी श्रुतिका, दीपिका, मुलगा कृष्णा असे कुटुंबातील सर्व सदस्य कामांचे व्यवस्थापन पाहतात. एक मजूर कुटुंब व्यवस्थापनासाठी ठेवले असता वर्षाला पावणेदोन लाख रुपयांपर्यंत मजुरी खर्च येतो. मात्र त्यात पूर्णपणे बचत झाल्याचे केशवराव सांगतात.

गणेश जयंतीमुळे मागणी आणि दरात वाढ

मागील आठवड्यात गणेश जयंतीमुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली होती. सोमवारी (ता. २३) सुमारे २ हजार ६७० फुलांच्या २६७ गड्ड्यांची पुणे बाजार समितीमध्ये विक्री केली. १० फुलांच्या गड्डीला साधारण ४० ते ५० रुपये दर मिळाला.

- केशव सणस, ९६२३०३०४०३ (शब्दांकन ः गणेश कोरे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com