Cotton Procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : शासकीय कापूस खरेदीची तयारी

CCI Cotton Procurement : कापूस दरांवर दबाव वाढत आहे. दर हमीभावाखाली येत असून, ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याची तयारी करीत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : कापूस दरांवर दबाव वाढत आहे. दर हमीभावाखाली येत असून, ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याची तयारी करीत आहे. जिल्ह्यात अकरा केंद्रे प्रस्तावित असल्याची माहिती ‘सीसीआय’चे विभागीय व्यवस्थापक अमरनाथ रेड्डी यांनी दिली.

जुलैत चांगला पाऊस झाला तरी ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने कोरडवाहू क्षेत्रातील कापसासह इतर पिकांची वाढ खुंटली. सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ८८ टक्के पावसाची नोंद झाली.

पावसाच्या ओढीने अद्याप कोरडवाहू क्षेत्रातील कापसाला बोंडे फुटलेली नाही. उडीद, मूग ही पिके वाया गेली. बागायती क्षेत्रातील कापसाचे उत्पादन बाजारात आले आहे. शेतकऱ्यांची या कापसाला अधिक चांगल्या दराची अपेक्षा आहे.

त्यामुळे कापूस बाजारात येत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरून अद्याप कापसाला मागणी सुरू झाली नाही. दरही कमी आहेत. यामुळे स्थानिक कापसाला व्यापाऱ्यांकडून मागणी नाही.

मुळातच, कापसाला चांगला भाव मिळाल्यास अधिकचा कापूस बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. ‘सीसीआय’ने ठरवले तरी दिवाळीनंतर सरकारी कापूस खरेदीचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी

दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सरकारी कापूस खरेदी सुरू होते. यंदा दिवाळीनंतर सरकारी कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा प्रश्न अद्याप अधांतरी असून ‘सीसीआय’ सहा केंद्रांवर खरेदी करणार आहे. ‘सीसीआय’चा ‘सब एजंट’ म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करते.

पणन महासंघाकडून राज्यात ५० केंद्रावर कापूस खरेदी होत असते. जळगाव, नागपूर, वणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, खामगाव, परभणी, नांदेड, परळी व छत्रपती संभाजीनगर या अकरा झोनमध्ये दोन टप्प्यांत कापूस खरेदीची सुरुवात पणन करते.

यंदा महासंघाचे प्रयत्न सुरू असले, तरी सरकार काय निर्णय घेणार, यावर पणन केंद्राचे भविष्य अवलंबून आहे. अजून सरकारने कापूस विकत घेण्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. बाजारात कापसाला व्यापारी भविष्यात देणारा संभाव्य दर पाहता, शेतकरी कापूस व्यापाऱ्यांना कापूस विकतील असे चित्र नाही. त्यामुळे सीसीआय’ने कापूस खरेदी केल्यास शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा दिलासा मिळेल. व्यापाऱ्यांवर कापूस दराबाबत नियंत्रण असेल.

बाजारात कापसाला सात हजारांपेक्षा दर कमी मिळत असल्यास सीसीआय’ कापूस खरेदी सुरू करेल. जिल्ह्यात रावेर, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, पहूर, शेंदूर्णी, जळगाव, आव्हाणे, चोपडा, बोदवड, भुसावळ याठिकाणी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
- अमरनाथ रेड्डी, विभागीय व्यवस्थापक, ‘सीसीआय’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT