vikram sawant meet d k shivkumar agrowon
ॲग्रो विशेष

Water Agreement : कर्नाटकचे पाणी जतला देऊ पण... ; डी. के. शिवकुमारांची महाराष्ट्रासोबत कराराची तयारी

Sangli news : सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील गावांना 'तुबची' योजनेचा लाभ देण्याबाबत कर्नाटक सरकारने सकारत्मकता दाखवली आहे.

Team Agrowon

Karnataka Government : माॅन्सूनच्या पावसाने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ओढ दिल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री मा. डी.के. शिवकुमार यांची भेट घेतली. कर्नाटक राज्याच्या तुबची बाबलेश्वर योजनेमार्फत जत तालुक्यातील पूर्वेकडच्या गावांना पाणी देण्याची मागणी केली.

जत तालुका हा पूर्वीपासून आवर्षनग्रस्त राहिलेला आहे. महाराष्ट्र सरकारने कोयना धरणाच्या म्हैसाळ योजनेला मंजुरी दिली. मात्र, अद्याप या योजनेचे पाणी देखील अजून पूर्व भागात पोचलेले नाही. त्यामुळे भागातील लोकांचा पाण्याचा प्रश्न कायम आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कर्नाटकने हिरे पडसलगी, तुबची-बबलेश्‍वर योजना राबवल्या आहेत. या योजनेंमुळे जत तालुक्यातील सुमारे ३२ गावांमध्ये पाच हजार हेक्टरवरील क्षेत्र बारमाही सिंचनाखाली आले आहे. यासाठी दोन्ही राज्यांमध्ये ठोस करार किंवा पाणीपट्टी आकारणी केली जात नाही. लोकांनी पुढाकार घेऊन तलावांमधून पाइपलाइन्स टाकल्या आहेत. त्यामुळे माळरानावर आता हिरव्या बागा फुललल्या आहेत.

कर्नाटक-महाराष्ट्र करार काय आहे ?

कर्नाटकमध्ये दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात हिप्परगी धरणातील पाणीसाठा तळाला गेला की हिप्परगीपर्यंतच्या उत्तर कर्नाटक भागातील चिकोडी, बागलकोट आणि विजापूरला पाणीटंचाई जाणवू लागते. अशावेळी महाराष्ट्राकडे पाणी सोडण्याची मागणी होते. कोयना धरणातून दरवर्षी ४ टीएमसी पाणी कर्नाटकला सोडले जाते.

मध्यंतरी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला पाणी आणण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानंतर कोयनेतून पाण्याच्या बदल्यात कर्नाटकने सीमावर्ती जत भागाला त्यांच्या योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी पुढे आली. त्यावर बराच राजकीय खल झाला. उन्हाळ्यामध्ये जत तालुक्यातील काही गावांनी तर थेट कर्नाटक राज्यामध्ये जाण्याची तयारी दर्शवली होती. या दोन्ही राज्यांमधील पाण्यावरून वाद सुरू आहे. कर्नाटकतून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रतून कर्नाटकला पाणी देण्याबाबत पाणी वाटप करार लवकरच करण्यात येईल, असे दोन्हीही राज्य सरकारकडून सांगण्यात येत पण निर्णय होत नसल्याने पाणी प्रश्न प्रलंबित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT