PDKV Akola  Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV, Akola : ‘पंदेकृवि’मध्ये ‘ॲग्रोटेक’ची तयारी सुरू ; विद्यापीठाच्या क्रीडांगणावर तीन दिवस आयोजन

Agrotech Agriculture Exhibition : कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर शुक्रवार (ता.२७) ते रविवार (ता. २९) दरम्यान तीनदिवसीय राज्यस्तरीय ‘ॲग्रोटेक २०२४’ कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर शुक्रवार (ता.२७) ते रविवार (ता. २९) दरम्यान तीनदिवसीय राज्यस्तरीय ‘ॲग्रोटेक २०२४’ कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तयारी सुरू झाली असून, कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी मंडपाचे भूमिपूजन केले.  

या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, सहयोगी कृषी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, शिक्षण विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. नितीन कोष्टी, मुख्य शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपुरे, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, मुख्य संपादक प्रा. संजीवकुमार सलामे, विद्यापीठ अभियंता कार्यालयातील अमित राठोड, परिमल बोरकर, विद्यार्थी कल्याण कार्यालयातील डॉ. रोहित तांबे यांच्यासह नरेन काकडे आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. गडाख यांच्या मार्गदर्शनात विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, आत्मा संचालक, सर्व कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी संशोधन केंद्रे, कृषी तंत्र विद्यालये, संशोधन प्रक्षेत्रे तथा विभाग हे कृषी प्रदर्शन व चर्चासत्र यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना फायदेशीर तंत्रज्ञान, संकल्पना कृतीत आणण्यासाठी मदत होत असते.

..यांचा असेल सहभाग
राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान, राज्य शासनाचा कृषी विभाग, जैविक शेती मिशन, महाबीजसह विविध राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित संस्था, कृषी निविष्ठांच्या उत्पादक कंपन्या, यंत्र अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या,

बी-बियाणे खते, कीटकनाशके, सेंद्रिय निविष्ठा आदींच्या उत्पादक कंपन्या यासह कृषी विद्यापीठातून शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या आणि स्वतः उद्योजक म्हणून सेवारत असणाऱ्या कृषी पदवीधरांची दालने, विदर्भातील स्वयंसाह्य बचत गटांच्या माध्यमातून निर्मित कृषी पूरक उत्पादने व खाद्यपदार्थांच्या दालनांचा समावेश असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT