
Nagpur winter session : सध्याच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे. ती पुढेही पाच वर्ष दिली जाईल. यात कोणताच बदल केला जाणार नाही, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली. ते आज (ता.१९) राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना बोलत होते. यावेळी त्यांनी, राज्यात २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचीही माहिती दिली.
यावेळी फडणवीस म्हणाले, मागच्या काळात राज्यात सरकारने सौर ऊर्जेचं काम हाती घेतले. ते जोरात पुढे नेले जात आहे. शेतकऱ्यांना दिवसाही थ्री फेज वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिणी २.O ही योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत सोलर ऍग्रो पॉवर लिमिटेड अशा कंपनीची स्थापना केली गेली आहे. आतापर्यंत १६ हजार मॅगावॅट विजेचे प्रकल्प सरकारने सुरू केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
फडणवीस यांनी योजनेतंर्गत ८४२८ कृषी वाहिन्या वेगळ्या करण्यात आल्या असून त्या सौरउर्जेवर कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ६६९ मेगावॅट वीजेची निर्मिती झाली आहे. तर १ लाख ३० हजार ४८६ शेतकऱ्यांना वीजेचे कनेक्शन देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच सरकारचा २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस असून दिवसाही शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल. सध्या शेतकऱ्यांना विज मोफत दिली जात असून याचा १५ हजार कोटींचा भार तिजोरीवर पडत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
याआधी शेतकऱ्यांना देण्यात येणारी वीज ८ रूपये पडायची आणि सरकार त्यांच्याकडून सव्वा किंवा दिड रूपये घेत होते. मात्र आता ही वीज तीन रूपये पडणार आहे. यामुळे सरकारच्या साडेचार रुपयांची बचत होणार आहे. याचा सारासार विचार केल्यास १० हजार कोटींची बचत फक्त वीज खरेदीत होणार होईल. तसेच क्रॉस सबसिडीतही ५ हजार कोटींची बचत होईल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
यासोबतच फडणवीस यांनी, मोफत वीज योजनाही सुरूच असून पुढच्या पाच वर्षात शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जाणार नाहीत. यात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. सौर कृषी पंप योजनेतून ९ लाख कृषी पंप उपलब्ध झाले असून पुढच्या काळात मागेल त्याला कृषी पंप तीन महिन्यात दिले जातील. तर २ लाख ३६ हजार १८६ कृषी पंपांची जोडणी करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सौर कृषी पंपासाठी योजना राबवली जात असून आत्तापर्यंत १२ लाख ४६ हजार ४२६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. पण फक्त १ लाख २९ हजार ८४७ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप बसवण्यात आल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ते राज्यपालांच्या भाषणावर बोलत होते. यावेळी दानवे यांनी आगामी अर्थसंकल्पात या योजनेसाठी आर्थिक तरतूद वाढवली तरच शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.