Crop Damage Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : प्राथमिक अहवालात नुकसानग्रस्त पिकांचे क्षेत्र दाखविले कमी

Crop Damage Survey : दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याविषयीची स्थिती जाणून घेण्यासाठी धाराशिवच्या तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

Team Agrowon

Dharashiv News : मतदारसंघातील कळंब आणि धाराशिव तालुक्यांत अतिवृष्टीमुळे १०० टक्के खरीप पिके बाधित झाली आहेत. मात्र, नुकसानीच्या प्राथमिक अहवालात बाधित क्षेत्र कमी दाखलिले आहे. अद्याप पिकांचे पंचनामेही झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या पिकांचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याविषयीची स्थिती जाणून घेण्यासाठी धाराशिवच्या तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

कळंब तालुक्यात सोयाबीनची ७४ हजार ६११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, मूग, उडीद, सुर्यफूल ही पिके धरुन ८० हजार ३२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तसेच धाराशिव तालुक्यात सोयाबीनची १ लाख ५ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, मूग, उडीद, सुर्यफूल ही पिके धरुन १ लाख १३ हजार १७७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्यामुळे सर्वच पिके बाधित झाली आहेत. कळंब तालुक्यात १०० टक्के पिके बाधित झालेली असतानाही नुकसानीच्या प्राथमिक अहवालात बाधित क्षेत्र कमी दर्शविले आहे.

तसेच धाराशिव तालुक्यातील काही महसूल मंडळांत अतिवृष्टी व सततचा पाऊस झाला. त्यामुळे १०० टक्के पिके बाधित झाली आहेत. मात्र, नुकसानीच्या प्राथमिक अहवालात बाधित क्षेत्र कमी दाखवले आहे. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतला गेला आहे.

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करणे आवश्यक होते, परंतु अद्यापपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. परिणामी शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर करावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश ग्रामस्तरीय संयुक्त समितीला दिले आहेत. पचंनाम्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचे निश्चित होईल.
- हेमंत ढोकले, तहसीलदार, कळंब.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT