Groundnut Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Crop Management : भुईमूग पिकात सिंचनासह खतांबाबत काटेकोर कार्यवाही

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग पिकाची लागवड मागील महिन्यात व डिसेंबरमध्येही झाली आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून, सिंचन, खतांबाबत शेतकरी काटेकोर व्यवस्थापन करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात भुईमूग पिकाची लागवड मागील महिन्यात व डिसेंबरमध्येही झाली आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून, सिंचन, खतांबाबत शेतकरी काटेकोर व्यवस्थापन करीत आहेत.

खानदेशात यंदा भुईमूग लागवड स्थिर आहे. काळ्या कसदार जमिनीत सातपुडा पर्वतालगतच्या पारंपरिक भागात लागवड झाली आहे. भुईमुगासाठी सातपुडा पर्वताचा पायथ्याच्या भाग प्रसिद्ध आहे. जळगावातील चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा या भागात भुईमूग लागवड अधिकची असते.

तसेच अलीकडे जळगावातील जामनेर, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धुळ्यातील साक्री, नंदुरबारमधील नंदुरबार व नवापूर भागातही भुईमूग लागवड होऊ लागली आहे. काळ्या कसदार जमिनीत ही लागवड अधिक आहे.

अनेकांनी भुईमूग लागवड तुषार व ठिबक सिंचनाच्या मदतीने केली आहे. यंदा खानदेशात लागवड स्थिर आहे. लागवडीत फारशी वाढ किंवा घटही झालेली नाही. कारण भुईमूग उन्हाळ पीक आहे.

उष्णतेत मजूर व अन्य समस्या राहत असल्याने यंदा जलसाठे मुबलक असूनही अनेकांनी लागवड टाळली किंवा वाढविली नाही. भुईमूग लागवडीऐवजी काहींनी कलिंगड, खऱबूज, केळी पिकास पसंती दिली आहे. खानदेशात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर भुईमूग लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड जळगाव जिल्ह्यात आहे. तसेच धुळे व नंदुरबारमध्येही लागवड आहे. काही कृषी संस्थांनी लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे. यामुळेही लागवड स्थिर आहे.

अनेकांनी गादी वाफा पद्धतीने लागवड केली असून, एकरी १८ ते २० क्विंटल ओल्या शेंगांचे उत्पादन साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तेलबिया पिकांत भुईमूग व तीळाचे दर स्थिर आहेत. यामुळेही भुईमूग लागवड स्थिर आहे. मागील हंगामात कोरड्या शेंगांना प्रति क्विंटल साडेपाच हजार ते सहा हजार रुपये दर मिळाला होता.

दर स्थिर होते. तसेच यंदा जलसाठे मुबलक आहेत. यामुळे अनेकांनी भुईमूग लागवड केली आहे. पिकात दोन वेळेस खते देण्यात आली आहेत. तसेच तणनियंत्रणदेखील करावे लागले आहे. पिकात तणनाशकांचा वापर केला जात नाही.

यामुळे मजुरांकरवी तणनियंत्रणाचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. ऊन तापत असल्याने सिंचन वाढविण्यात आले आहे. कारण पीक वाढीच्या अवस्थेत आहे. लवकर शेंगा पक्व होतील. यामुळे सिंचनाबाबत काटेकोर कार्यवाही शेतकरी करीत आहेत. पुढे जसे ऊन वाढेल, तशी सिंचनाची कार्यवाही होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sericulture Technology : रेशीम उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

Property Sale and Purchase Deals: खरेदी-विक्री व्यवहारांसाठी ‘आधार’ प्रमाणीकरण बंधनकारक

Data Hub Development: महाराष्ट्र ‘आशियातील सर्वांत मोठे डेटा हब’ बनेल: विधानसभा अध्यक्ष नार्वेकर

Moringa Processing Unit Inaugurated: आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याचा मार्ग; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्‌घाटन

Bembla Dam Discharge Issue: बेंबळा विसर्गाच्या नुकसानीचा अहवाल शेतकऱ्यांनी जाळला; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT