Cotton Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop Damage : पूर्वहंगामी कापसाची नुकसानीकडे वाटचाल

Cotton Cultivation : खानदेशात यंदा पूर्वहंगामी कापसाची लागवड अगदी १२ मेपासून अनेकांनी केली आहे. पिकात कैऱ्या पक्व होत आहेत. त्यात सततच्या पावसाने फुल-पाते गळ सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पूर्वहंगामी कापसाची लागवड अगदी १२ मेपासून अनेकांनी केली आहे. पिकात कैऱ्या पक्व होत आहेत. त्यात सततच्या पावसाने फुल-पाते गळ सुरू आहे. तसेच अतिपावसाने शेतांतील सखल भागात पाणी साचले असून, पीक पिवळे- लाल पडून नष्ट होत आहे.

पिकाची वाढही अतिपावसाने अनेक भागांत खुंटली आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशात वातावरण मागील ३५ ते ४० दिवसांत एक वेळेसही खानदेशात नव्हते. कापूस पिकाची अवस्था काळ्या कसदार जमिनीत बिकट बनली आहे. पाऊस थांबायला हवा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे.

यंदा सुमारे आठ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड ५० हजार हेक्टरने कमी झाली आहे. मागील हंगामात कापसाची एकूण लागवड जिल्ह्यात पाच लाख ६७ हजार हेक्टरवर झाली होती. यंदाची लागवड पाच लाख ११ हजार हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्यात कापसाखालील सर्वसाधारण क्षेत्र पाच लाख नऊ हजार हेक्टर एवढे असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यात लागवड अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे कृषी विभाग सांगत आहे.

धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे दोन लाख ९६ हजार हेक्टरवर कापूस पीक आहे. धुळे जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. यात खानदेशात पूर्वहंगामी कापसाचे पीक सुमारे एक लाख ७० हजार हेक्टरवर आहे. जळगाव जिल्ह्यातील पूर्वहंगामी कापसाची लागवड सुमारे एक लाख १५ हजार हेक्टर एवढी आहे.

यंदा अन्य राज्यांतूनही अनधिकृत कापूस बियाणे कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून दाखल झाले होते. अनेकांनी १२ मे रोजी पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड केली आहे. कमाल शेतकऱ्यांनी २५ मे पर्यंत पूर्वहंगामी कापूस लागवड उरकली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी पाच - सहा जूनपर्यंत देखील पूर्वहंगामी कापूस लागवड केली. मेमध्ये लागवड केलेल्या कापसाची उंची दोन फुटांवर आहे. त्यात कैऱ्या पक्व होत आहेत. फुले-पातेही लगडत आहेत.

किमान आठ दिवस हवी पावसाची उघडीप

पावसामुळे पिकात आंतरमशागत, फवारणीची कामेही होऊ शकली नाहीत. सखल भागात पाणी तसेच राहिले. किमान आठ ते १० दिवस पावसाची उघडीप हवी आहे. यामुळे पाण्याचा निचरा होईल. वाफसा स्थिती कायम राहून पीकवाढीस चालना मिळेल. आंतरमशागत, तणनियंत्रण व फवारणीची कामेही उरकता येतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Temperature Rise Problem : तापमानवाढ नियंत्रणासाठी कधी एकत्र येणार?

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

SCROLL FOR NEXT